Akola Crime News : अकोला जिल्ह्यातील सावरखेड गावाजवळ 23 जानेवारीच्या रात्री कार दरीत कोसळून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. तर या अपघातानंतर ही गाडी जळालेल्या अवस्थेत दिसून आली होती. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारण आधी सावरखेड गावात गुरे चोरण्यासाठी आलेल्या एका गाडीचा गावकऱ्यांनी पाठलाग केला होता. यात संशयितांची गाडी अनियंत्रित झाली आणि ती गाडी दरीत कोसळल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. यात वाशिम जिल्ह्यातील कारंजा येथील रहेमत खान हमीद खान याचा मृत्यू (Crime News) झाला होता. या गाडीत तीनजण असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, मृतकासोबत गाडीत असलेल्या शेख वसिमोद्दीन याच्या पोलीस जबाबातून या गाडीत एका डॉक्टरसह एक महिला आणि इतर पाचजण असल्याचे समोर आलंय.
यासोबतच हे प्रकरण गोवंश चोरीचं असल्याचं सांगितलं जात असलं तरी यात पैशाचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवणारी टोळी असल्याचे बोलले जातंय. तसेच मृतकासह गाडीतील इतर चारजण या टोळीतील असल्याचं बोललं जातंय. सोबतच या माध्यमातून कोट्यावधींचा व्यवहार झाल्याचं ही बोललं जातंय. या संपुर्ण प्रकरणात पातूर पोलिस अनेक तथ्य का लपवत आहेत? यावरून संशय व्यक्त होतोय. परिणामी या प्रकरणाला आयात नवा ट्विस्ट येण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
नेमकं प्रकरण काय?
अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातल्या सावरखेड गावात संशयित गुरे चोरणाऱ्या टोळीतील एकाचा दरीत पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. रात्री बारा वाजता एका कारमधून तिघेजण गावात आले होते. त्यानंतर गावकऱ्यांनी पाठलाग केल्यानंतर भरधाव कार उलटली आणि उलटलेल्या कारमधून पळताना एकाचा दरीत कोसळून मृत्यू झाला. रहेमत खान हमीद खान असं मृतकाचं नाव. मृतक वाशिम जिल्ह्यातल्या कारंजाचा रहिवासी असल्याचे पुढे आले होते. या घटनेनंतर अपघातग्रस्त संशयित कारचे टायर अज्ञात लोकांनी पेटवून दिल्याचीही माहिती पुढे आली होती. या घटनेत दोनजण जखमी झाले होते. त्यानंतर पातूर पोलिसांनी तपासाचे सूत्र हाती घेत पुढील तपास सुरू केला.
धावत्या मोटार सायकलने घेतला पेट
जळगावमध्ये उभ्या कारने पेट घेतल्याची घटना ताजी असताना, आता धावत्या मोटार सायकलने ही पेट घेतल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील पिलोदा खुर्द फाट्या जवळ घडल्याने खळबळ उडाली आहे. मनवेल येथील पुरुषोत्तम पाटील हे आपल्या मोटार सायकलने जात असताना त्यांना मोटार सायकल मधील इंजिन मधून धूर निघत असल्याचं निदर्शनास आले. त्यानंतर मोटार सायकल थांबवत पुरुषोत्तम पाटील हे बाजूला झाले. मात्र काही वेळातच मोटार सायकलने पेट घेतल्याने मोटार सायकल जळून खाक झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या