नागपूर : घुग्गुस शहरातून अपहरण झालेल्या 25 वर्षीय शुभम फुटाणे याचा मृतदेह आढळून आला आहे. शुभम फुटाणे याचा जाळून निर्घृणपणे खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झालं आहे. 17 जानेवारीला रात्री डब्लूसीएल (WCL) वसाहतीत राहणारा शुभम फुटाणे बेपत्ता झाला होता. त्यानंतर त्याच्याच मोबाईलवरून अपहरणकर्त्यांनी त्याच्या कुटुंबीयांना 30 लाखांच्या खंडणीसाठी व्हाट्सअॅपवर मेसेज केला होता.
धक्कादायक म्हणजे या खून आणि अपहरण प्रकरणात गणेश पिंपळशेंडे या युवकाला अटक केली आहे. याच गणेश पिंपळशेंडे याने वीर खारकर या 8 वर्षीय मुलाचे घुग्गुस शहरातून 3 नोव्हेंबरला अपहरण केले होते. त्यावेळी पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. मात्र, आरोपी गणेश हा जामिनावर सुटला होता.
पत्नी आणि मुलानेच काढला नवऱ्याचा काटा, नांदेड येथील घटना
आरोपीकडून गुन्हा मान्य
अपहरणाच्या घटनेनंतर शुभमची दुचाकी घुग्गुस-चंद्रपूर मार्गावर एका खाजगी रुग्णालयाजवळ आढळली होती. त्या दुचाकीवर रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले होते. पोलिसांनी रक्ताचे नमुने घेवून DNA तपासणी केली असता त्याचे नमुने गणेश पिंपळशेंडे सोबत मॅच झाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी गणेशला ताब्यात घेवून चौकशी केली. तेव्हा त्याने शुभमचा खून केल्याचे मान्य केले असून खून केलेली जागा आणि मृतदेह जाळला ती जागाही दाखवली. घुग्गुस येथील स्वागत लॉनच्या मागे ही घटना घडली.