Ghatkopar Crime News : घाटकोपरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात कॅन्सरग्रस्त मुलीच्या देखभालीसाठी ठेवलेल्या नेपाळी नर्सनेच घरातल्या तिजोरीवर डल्ला मारल्याची (Crime News) घटना घडली आहे. यात नेपाळी महिला आरोपीने घरातून तब्बल 5 लाख 92 हजार किंमतीची मालमत्ता आणि 3 लाख 50 हजारांची रोख आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली आहे. मात्र घाटकोपर पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपी महिलेला अॅन्टाॅप हिलच्या प्रतिक्षानगरमधून अटक केली आहे. 


घाटकोपर पोलिसांनी ठोकल्या आरोपी महिलेस बेड्या 


पुढे आलेल्या माहितीनुसार, सावित्री कमल थापा(वय वर्ष 26) असे या महिलेचे नाव आहे. नवी मुंबईच्या पनवेल येथील विचुंबे गावात ही वास्तव्याला होती. दरम्यान ही घटना घडली असून सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. एकीकडे सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांग्लादेशी असल्याची घटना ताजी असतानाच घाटकोपर पोलिसांनी चोरीच्या गुन्ह्यात एका नेपाळ स्थित महिलेला चोरीच्या गुन्ह्यात अटक केल्याने बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा चर्चेत आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या