Nagpur News नागपूर :  नागपूरच्या सोनेगाव पोलीस ठाण्यांतर्गत एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. यात नागपूरच्या मनीष नगर लेआऊट मधील स्वावलंबी नगरमध्ये भीषण अपघात घडला असून यात एका दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी  (Nagpur Accident) मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली असून संपूर्ण परिसर या अपघताने हादरला आहे. यात या चिमुकल्याची आई घरातील कामात व्यस्त असताना घराच्या अंगणात खेळणाऱ्या दीड वर्षाच्या मुलाचा अचानक तोल गेला आणि तो अंगणातील विहिरीत पडला. बराच वेळ होऊन मुलगा दिसत नसल्याने शोधा शोध केल्यानंतर  उशीरा तो विहिरीत पडल्याची बाब समोर आली.


परिणामी, विहरीत बुडून या बाळाचा मृत्यू झालाय. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेने मात्र संपूर्ण परिसरामध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


आईची शोधाशोध, नंतर जे घडलं त्यानं सर्वच हादरले


रुद्रांश आशिष डोनारकर असे या दीड वर्षीय मृत चिमूकल्याचे नाव आहे. मृत रुद्रांशचे वडील आशिष डोनारकर हे स्वावलंबी नगर येथील रहिवासी असून ते एका खासगी कंपनीत काम करतात. तर त्यांच्या पत्नी या गृहणी आहेत. घटनेच्या दिवशी दुपारी आशिष कामावर गेले होते, तर त्याची पत्नी घरात कामात व्यस्त होती. त्याचवेळी दीड वर्षाचा रुद्रांश घरात एकटाच खेळत होता. घराच्या बाहेरील अंगणात एका कोपऱ्यात एक विहीर आहे. मात्र, त्या विहरीवर जाळी पूर्णपणे झाकली नव्हती. रुद्रांश त्या दिवशी तिथेच खेळत असतांना खेळता खेळता रुद्रांश अंगणात असलेल्या विहिरीजवळ पोहोचला आणि याच दरम्यान त्याने विहिरी जवळ ठेवलेली चप्पल विहिरती फेकून दिली. त्यानंतर त्याने विहिरी डोकावून पाहिले असतांना त्याचा तोल जाऊन तो विहिरीत पडला. मात्र, जवळ कुणीही नसल्याने हा प्रकार कुणाच्याही लक्षात आला नाही. 


परिसरात एकच शोककळा 


घटना घडल्यानंतर बराच वेळानंतर रुद्रांशच्या आईने काम आटपून रुद्रांशचा शोध घेतला असता तो कुठेही दिसून आला नाही. त्यानंतर त्यांनी आजूबाजूच्या परिसरात त्याचा शोध घेतला असता, त्यांना तो कुठेच दिसला नाही. नंतर विहिरीजवळ जाऊन पाहिले असता तिथे एक चप्पल दिसली. त्यानंतर तिने विहिरीत डोकावून पाहिले असता रुद्रांशचा मृतदेह विहिरीत तरंगताना दिसला. हे पाहताच रुद्रांशच्या आईने एकच आरडा ओरडा करत टोह फोडला.  त्यानंतर या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला असून या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या