Jalna News: जालन्यातील (Jalna) एका महिलेचा गाडीला आग लागल्याने मृत्यू झाला होता, पंरतु या गाडीला तिच्या पतीनेच आग लावल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. जालन्यातील तळणी फाटा येथे एका गाडीने पेट घेतल्याने त्यामध्ये एका 33 वर्षीय महिलेचा जळून मृत्यू झाला होता. परंतु या गाडीला आग त्या महिलेच्या पतीनेच लावली होती असं पोलिसांच्या तपासातून उघड झालं आहे.  गुरुवारी (29 जून) रोजी पहाटे चार वाजताच्या हे पती पत्नी शेगावमधून दर्शन घेऊन घरी परत येत होते. त्यावेळेस त्यांच्या गाडीला आग लागली. पंरतु या महिलेचा पती जेव्हा गाडीतून खाली उतरला तेव्हाच या गाडीला आग लागली. आगीचे प्रमाण मोठे असल्याने तात्काळ स्थानिक पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांच्या मदतीने आग विझवण्यात आली. मात्र तोपर्यंत सविता साळुंखे या 33 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. 


या घटनेची माहिती मृत महिलेच्या पतीच्या भावाने पोलिसांना दिली. त्यांनतर पोलिसांनी शवविच्छादनासाठी मृतदेह पाठवला. दरम्यान संपूर्ण प्रकाराची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत होती. पण पोलिसांच्या तपासामध्ये एक धक्कादायक खुलास करण्यात आला आहे. त्या महिलेच्या पतीनचे त्यांच्या गाडीला आग लावली होती असं पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. दरम्यान पोलिसांनी आरोपी अमोल सोळुंके याला पोलिसांना ताब्यात घेतलं आहे. सविता यांचा अमोल यांच्याशी विवाह झाला होता. पंरतु लग्नाला अनेक वर्ष झाल्यानंतरही या दाम्पत्याला मूल होत नव्हते. त्यामुळे अमोल सविता यांचा छळ करत असे. 


अमोलने अनेकदा या कारणावरुन त्याच्या पत्नीला मारहाण देखील केली आहे. पंरतु त्याचा राग वाढतच गेला. ज्या दिवशी गाडीला आग लावली त्या दिवशी त्यांने पोलिसांकडे जबाब देखील नोंदवला होता. परंतु त्याने त्याच्या जबाबामध्ये म्हटलं होतं की, त्यांच्या गाडीला आधी एका ट्रकने धडक दिली, त्यानंतर त्यांच्या गाडीला आग लागली. पण पोलिसांनी जेव्हा त्या कारची पाहणी केली तेव्हा गाडीला धडक बसल्याच्या कोणत्याही खुणा त्यावर नव्हत्या. तसेच आग लागल्याचं लक्षात आल्यानंतरही पतीने आग विझवण्याचे प्रयत्न का केले नाही असा सवाल देखील पोलिसांनी विचारला. मात्र अमोलने यावर काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर पोलिसांची चौकशी झाल्यानंतर या महिलेच्या पतीनेच हा गुन्हा केल्याचं यामध्ये उघड झालं. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. 


हे ही वाचा: 


संभाजीनगर हादरलं! नववीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर दोघांचा बलात्कार; 6 महिन्यांपासून सुरु होते लैंगिक शोषण