kalyan Latest Crime News in Marathi : अल्पवयीन मुलावर 32 वर्षीय महिलेनं तीन वर्ष लैंगिक अत्याचार (Crime News) केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कल्याणमधील कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून महिलेला अटक केली. अल्पवयीन मुलाच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आरोपी महिलाचं नाव कीर्ती घायवटे असे असून ती मूळची नाशिकची आहे.


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा कल्याण पूर्व येथे आपल्या आजीसोबत राहत आहे. तो एका इंग्रजी शाळेत नववीत शिकतो. आरोपी महिला नाशिकची रहिवासी असून, महिलेला दोन मुले आहेत. मुलाची मावशी नाशिकमध्ये राहते, आरोपी महिला आणि मुलाच्या मावशीचे जवळचे संबंध होते. मावशी जेव्हा कल्याणला यायची तेव्हा ती आरोपी महिलेलासोबत घेऊन यायची, त्यामुळे पीडित मुलगा आणि कीर्तीची ओळख झाली होती.


पीडित मुलगा नाशिकमध्ये (Nashik) त्याच्या मावशीच्या घरीही जायचा, त्यामुळे त्या मुलाला पाहून महिला आकर्षित झाली. मुलाच्या ओळखीचा फायदा घेत किर्तीने एका अल्पवयीन मुलाशी ओळख वाढवली. विविध प्रलोभने दाखवून कीर्तीने मुलाशी जवळीक वाढवली. महिलेने मुलाला बंद खोलीत बोलावून जबरदस्तीने दारू पाजली. मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून मुलाचे मानसिक संतुलन बिघडवण्याचे काम केले. मुलासोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले. महिला आरोपीने स्वत:ला विवस्त्र करून मुलाला विवस्त्र करून मोबाईल फोनवर व्हिडिओ बनवला. एवढंच काय, यामुळे मुलाला दारूचं व्यसन लागलं. मुलगा रोज कोणाशी ना कोणाशी फोनवर बोलायचा, अभ्यासात रस नसल्यामुळे त्याच्या आईला संशय आला. एके दिवशी त्याच्या आईने त्याचा मोबाईल तपासला तेव्हा तिने एका व्हिडिओमध्ये पाहिले की, तो एका महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवत आहे. 


या संपूर्ण घटनेनंतर मुलाच्या आईला धक्काच बसला. पायाखालची जमीन सरकली. याबाबत आईने मुलाला विचारले असता तिने संपूर्ण घटना सांगितली. कुटुंबीयांनी त्याला भिवंडी शहरातील बालसुधारगृहात दाखल केले. बालसुधार विभागाने मुलाचे समुपदेशन केले. त्यानंतर त्या महिलेविरुद्धात पोलिसांत तक्रार दाखल केली. कोळसेवाडी पोलिसांनी त्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला.  आईच्या तक्रारीवरून कोळसेवाडी पोलिसांनी महिलेविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करून महिला आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. 


आणखी वाचा :
Kolhapur Crime : एकाच गावात दीड महिन्यात चार तरुणांची आत्महत्या; टोकाच्या निर्णयाने गावकरी हबकले