Zomato Share Price : सलग दुसऱ्या ट्रेडिंग सत्रात फूड डिलीव्हरी चेन कंपनी झोमॅटोच्या शेअर दरात मोठी घसरण दिसून आली. मंगळवारी ट्रेडिंग सेशनमध्ये झोमॅटोच्या शेअर दरात जवळपास 12 टक्क्यांनी घसरण झाली. झोमॅटोच्या शेअर दराने मंगळवारी 41.40 रुपयांचा स्तर गाठला होता. सध्या हा शेअर 12.39 टक्क्यांच्या घसरणीसह  41.70 रुपयांवर ट्रेड करत होता. सोमवारीदेखील झोमॅटोच्या शेअरमध्ये 14 टक्क्यांहून अधिक घसरण दिसून आली. मागील दोन दिवसात शेअर दरात 23 टक्क्यांनी घसरण झाली आहे. 


झोमॅटोच्या शेअर दरात मागील दोन दिवसात 20 टक्क्यांहून अधिक घसरण झाली असली तरी परदेशी ब्रोकरेज हाऊज जेफरीज् यांनी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या असलेल्या शेअर दराच्या किंमतीपासून  झोमॅटोचा शेअर गुंतवणूकदारांना 130 टक्क्यांहून अधिक परतावा देऊ शकतो, असे जेफरीज् ने म्हटले. अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेड रिझर्व्हकडून व्याज दर वाढवण्याची दाट शक्यता आणि गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री याचा परिणाम झोमॅटोसारख्या शेअरवर झाला आहे. 


झोमॅटोच्या शेअर दरात घसरण का?


झोमॅटो कंपनीची शेअर बाजारात लिस्टिंग होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. मागील वर्षी 23 जुलै 2022 रोजी गुंतवणूकदारांसाठी लॉक इन पिरीयड संपला होता. या लॉक-इन पिरीयडमध्ये शेअर विक्री करता येत नव्हती. हा अवधी संपल्यामुळे मोठ्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर विक्री केली. मंगळवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर झोमॅटोच्या 342 कोटींच्या 7.65 कोटी  शेअर्सची विक्री करण्यात आली. तर, बीएसईवर 46.22 लाख शेअर्सची विक्री झाली. 


(Disclaimer: शेअर बाजारातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आम्ही कोणत्याही प्रकारे शेअर खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही. )


इतर महत्त्वाच्या बातम्या: