YouTuber Income News: अलीकडच्या काळात शिक्षण होऊन देखील अनेक तरुण नोकरीच्या (Job) मागे न लागता वेगळा पर्याय निवडतात. कोणी उद्योग, व्यवसाय करतं, तर कोणी यशस्वी शेती करतं. हे चित्र सर्रास पाहायला मिळत आहे. अलिकडच्या काळात अनेक तरुण युट्यूबच्या (YouTuber) माध्यमातून मोठा पैसा कमवतात. कोणताही खर्च न करता पैसे मिळवण्याचा युट्यूब हा एक उत्तम मार्ग आहे. दरम्यान, युट्यूबर्स भरघोस पैसा कसा मिळवतात? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.  


दरम्यान, गेल्या काही वर्षात युट्यबर्स मोठ्या प्रमाणात पैसा मिळवत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. अनेक युट्यबर्सने यूट्यूबच्या कमाईतून कोणी घर बांधले तर कोणी कार खरेदी केल्याची अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. त्यामुळं यूट्यूबवर व्हिडीओ तयार करुन, त्यामाध्यमातून पैसे कमवण्याचा एका चांगला व्यवसाय आहे. यामध्ये तुम्हाला जास्त कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याची गरज नाही. जाणून घेऊयात सविस्तर माहिती. 


YouTube वर व्हिडीओ अपलोड केल्यास लगेच पैसे मिळत नाहीत 


YouTube वर व्हिडीओ अपलोड केल्याबरोबर लगेच तुम्हाला पैसे मिळत नाहीत. यासाठी तुम्हाला YouTube चॅनेलच्या सेटिंगमध्ये जावे लागते. या सेटिंगच्या माध्यमातून तुम्हाला जाहीराती मिळवण्यासाठी  अॅल्पालय करावे लागेल. त्यानंतर तुमचे आकाउंड अप्रूव्ह होते. त्यानंतर तुमच्या व्हिडीओच्या जाहीरतीनुसार तुम्हाला पैसे मिळतात.


युट्यूबवर येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून मिळकत 


युट्यूबवर येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून तुम्ही मोठी मिळकत करु शकता. युट्यूबवर जेव्हा कोणी तुमचा व्हिडिओ पाहतो आणि त्यावर जाहिरात प्ले केली जाते. तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात. YouTubers ला मिळणारे पैसे देखील वेगवेगळ्या कन्टेंटवर वेगवेगळ्या जाहिरातींनुसार बदलतात. जाहीरतींच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करु शकता. 


ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातून कमाई 


ब्रँड प्रमोशनच्या माध्यमातून कमाई  तुम्ही चांगली कमाई करु शकता. ब्रँड प्रमोशन हे YouTube वरुन कमाईचे एक चांगले साधन मानले जाते. परंतू, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा तुमच्याकडे भरपूर सदस्य असतील. तसेच जेव्हा तुम्हाला मोठ्या ब्रँडची जाहिरात करण्याची संधी मिळेल तेव्हाच तुम्ही ब्रँड प्रमोशनमधून चांगले पैसे कमवाल. तसेच, जर तुम्हाला लहान ब्रँड्सची जाहिरात करण्याची संधी मिळाली तर ती गमावू नका, कारण यामुळे मोठ्या ब्रँडकडून करार मिळण्याची शक्यता वाढते.


एफिलिएट लिंकद्वारे मिळकत


एफिलिएट लिंकद्वारे देखील तुम्ही  YouTube च्या माध्यमातून पैसे मिळवू शकता. नेक वेळा तुम्ही पाहिले असेल की काही YouTubers तुम्हाला संलग्न लिंक वापरून काहीतरी खरेदी करण्यास सांगतात. जेव्हा तुम्ही हे करता तेव्हा तुम्हाला ते उत्पादन त्याच किंमतीला मिळते ज्यावर ते विकले जाते, परंतु त्याच्या नफ्याचा एक छोटासा भाग देखील त्या YouTuber ला जातो ज्याने त्या लिंकचा प्रचार केला आहे. त्यामुळं हे देखील कमाईचे चांगले साधान आहे. 


स्वतःची उत्पादने विकून मिळकत करता येते


तुमची स्वतःची उत्पादने विकून तुम्हाला चांगली मिळकत करता येते. असे अनेक YouTubers आहेत जे फक्त YouTube वर स्वतःचा व्यवसाय देखील चालवतात. असे YouTubers त्यांच्या YouTube व्हिडिओंद्वारे त्यांच्या उत्पादनांची जाहिरात देखील करतात आणि त्यांची विनामूल्य विक्री केली जाते. तसेच, जर त्यांचे व्हिडिओ खूप पाहिले गेले तर ते त्यावरील जाहिरातींमधून पैसे देखील कमावतात. एवढेच नाही तर त्यांच्या स्वतःच्या उत्पादनाच्या जाहिरातीमुळे उत्पादनाची विक्री वाढते आणि हा त्यांच्या कमाईचा एक भाग बनतो.


महत्वाच्या बातम्या:


भाजप गूगल जाहिरातींसाठी 100 कोटी खर्च करणारा पहिला पक्ष, Google, YouTube Ads चा अहवाल