YouTube Contributed To Indian Economy : सोशल मिडिया (Social Media) हे केवळ नेटवर्किंगचे साधन नाही तर उत्पन्नाचे एक मजबूत स्त्रोत देखील आहे. कोरोना महामारीच्या (Coronavirus) काळात जेव्हा लॉकडाऊन (Lockdown) जाहीर करण्यात आले. तेव्हा जगातील अनेक लोकं विविध सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर आपली कला सादर करताना दिसले. ऑक्सफॉर्ड युनि्व्हसिटीच्या रिपोर्टनुसार (Oxford University), युट्यूबने (Youtube) भारतीय अर्थव्यवस्थेत 6800 कोटी रुपयांचे योगदान दिल्याची माहिती समोर आली.  सोशल मिडीयामुळे अनेकांना स्टार बनवलं. गाव-खेड्यातील मुलांच्या कलांना या सोशल मिडीयाने व्यासपीठ दिलं. ज्याचं युट्यूबच्या कृपेने संपूर्ण आयुष्य बदलून गेलंय. मात्र लोकांनी मिळवून दिलेली हीच प्रसिद्धी सोलापूरच्या कुटुंबीयांसीठी डोकेदुखी ठरत आहे.


युट्यूबचे् भारतीय अर्थव्यवस्थेत तब्बल 6,800 कोटी रुपयांचे योगदान 
व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म YouTube ने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2020 मध्ये, YouTube ने भारतीय अर्थव्यवस्थेत अंदाजे 6,800 कोटी रुपयांचे योगदान दिले. यासोबतच YouTube ने 2020 मध्ये भारतात सुमारे 6 लाख लोकांना पूर्णवेळ नोकऱ्या देण्यातही आपली भूमिका बजावली. ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या स्वतंत्र सल्लागार कंपनीच्या 'असेसिंग द इकॉनॉमिक, सोशल अँड कल्चरल इम्पॅक्ट ऑफ यूट्यूब इन इंडिया' या स्टडी रिपोर्टमध्ये ही आकडेवारी समोर आली आहे. सरकारने गेल्या वर्षी सोशल मीडियावर शेअर केलेल्या अंदाजानुसार  , देशात 448 दशलक्ष YouTube वापरकर्ते, 53 दशलक्ष व्हॉट्सअॅप वापरकर्ते, 41 दशलक्ष फेसबुक वापरकर्ते, 210 दशलक्ष इन्स्टाग्राम आणि 17.5 दशलक्ष ट्विटरवर आहेत. YouTube ने म्हटले आहे की, व्हि़डिओ शेअर केल्यानंतर मिळालेल्या कमाई व्यतिरिक्त, अनेकांना जागतिक चाहतावर्ग मिळविण्यात मदत करते. याच्या माध्यमातून ब्रँड भागीदारी, लाइव्ह परफॉर्मन्स आणि इतर मार्गांद्वारे कमाई करणं शक्य झाले आहे. हा महसूल (revenue) केवळ उद्योजकांसाठी नोकऱ्या आणि उत्पन्न निर्माण करत नाहीत, तर इतरांना प्रोत्साहन देणारे देखील ठरतात.


डिजिटल आणि सोशल मीडिया कंपन्यांसाठी भारत एक मोठी बाजारपेठ
YouTubeचे प्रादेशिक संचालक (आशिया-पॅसिफिक) अजय विद्यासागर म्हणाले की, देशातील YouTube व्यवसायात आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि सांस्कृतिक प्रभावावरही परिणाम करण्याची क्षमता आहे. एक सॉफ्ट-पॉवर म्हणून उदयास येण्याची क्षमता आहे. डिजिटल आणि सोशल मीडिया कंपन्यांसाठी भारत ही एक मोठी बाजारपेठ आहे आणि स्मार्टफोनची वाढती विक्री आणि परवडणारे डेटा दर यामुळे लोकांची पसंती वाढत आहे.YouTube सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कंटेटचा दर्जा देखील सुधारत आहे. प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पूर्वी द्वेषयुक्त भाषण, चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांसाठी टीका करण्यात आली होती, त्यामुळे आता नेहमीपेक्षा अधिक जबाबदारी वाढत आहे. 


लहान आणि मध्यम व्यवसायिकांसाठीही फायदेशीर 
ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सचे सीईओ एड्रियन कूपर म्हणाले, "भारतीय निर्मात्यांना त्यांची व्यावसायिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी तसेच त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी YouTube फायदेशीर असल्याचे संशोधनातून दिसून आले आहे." YouTube चॅनेलसह लघू आणि मध्यम व्यावसायिकांचे देखील हेच मत आहे की, हा प्लॅटफॉर्म त्यांना जगभरातील नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करतो.


युट्यूबमुळे सोलापूरच्या शिंदे कुटुंबाला मिळाले नवीन जीवन
लॉकडाऊनमध्ये भल्याभल्यांच्या रोजगारावर गदा आली. प्लबिंगचा व्यवसाय करणारा गणेश ही त्याला अपवाद ठरला नाही. युट्यूबवर व्हिडिओ बनवणं सुरु होतं. त्यातून पैसे मिळतात हे मात्र ठाऊक नाही. अशात बायको गरोदर. बायकोची डिलेवरीला देखील पैसे नाहीत अशा काळात युट्यूबच्या याच चाहत्यांनी सोलापूरच्या गणेश शिंदेंच्या कुटुंबाला नवीन जीवन दिलं. 


इतके पैसे आले कुठुन? नेटकरी करताएत ट्रोल
युट्यूबच्या माध्यमातून गणेश शिंदेचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या आता स्थिरावलाय. या माध्यामातून मिळणाऱ्या पैशातून त्यानं टुमुदार घर बांधलं. घरात साजेल असं फर्निचर देखील खरेदी केलं. इतकचं काय तर काही दिवसांपुर्वी त्याने चार चाकी वाहनाची खरेदी देखील केलीय. मात्र काही महिन्यांपूर्वी बायकोच्या डिलेव्हरीसाठी पैसे नसणाऱ्याकडे इतका पैसा कसा आला? असे म्हणत काही जण त्यांना ट्रोल करतायत तर काही जण फोन करुन धमक्या देखील देत असल्याचे समजले