Indian Economy :  भारतीय अर्थव्यवस्था रूळावर आली आहे. त्यामुळे आगामी दिवसांमध्ये वाढत्या महागाईपासून ( Retail Inflation) दिलासा मिळेल.  याबरोबरच येत्या काही दिवसांत व्यापारातील तूट हळूहळू कमी होईल. वित्तीय सेवा कंपनी मॉर्गन स्टॅन्लेने त्यांचा अहवालात जाहीर केला आहे. या अहवालामध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. 


मॉर्गन स्टॅन्लेच्या प्रमुख उपासना छाच्छा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यात क्रूड ऑइल वगळता कमोडिटीच्या किमती स्थिर होत्या. मात्र, कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली आहे. भारतासाठी मॅक्रो-अस्थिरतेचा काळ आता मागे पडला आहे. महागाई आणि व्यापार तूट हळूहळू कमी होईल. ऑगस्ट 2022 मध्ये किरकोळ महागाई दर 7 ते 7.2 टक्के राहण्याचा अंदाज आहे. सप्टेंबर महिन्यात तो सात टक्के राहू शकतो, त्यानंतर त्यात घट होईल. वस्तूंच्या किमतीत झालेली घसरण आणि पेट्रोल -डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याच्या निर्णयामुळे व्यापार संतुलन सुधारण्यास मदत होईल.  


"जुलै महिन्यात किरकोळ महागाईचा दर 6.71 टक्के राहिला आहे. हा दर चालू आर्थिक वर्ष 2022-23 साठी RBI च्या अंदाजाइतका आहे. गेल्या सात महिन्यांपासून किरकोळ चलनवाढीचा दर आरबीआयने ठरवलेल्या पातळीपेक्षा वरच राहिला आहे. सरकारने मार्च 2026 पर्यंत महागाई दर चार टक्के ठेवण्याचे लक्ष्य आरबीआयला दिले आहे. यामध्ये दोन टक्के अप-डाउन मार्जिन समाविष्ट आहे. जुलै महिन्यात कच्च्या तेलाच्या किमती आठ टक्क्यांनी घसरल्या आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 92 डॉलरच्या पातळीवर आले आहेत. आगामी काळात हे दर देखील आणखी खाली येऊ शकतात. त्यामुळे आगामी काळात वाढत्या महागाईपासून दिलासा मिळेल. महागाई दरात घट झाल्यास व्याजदर वाढवण्याचा रिझर्व्ह बँकेवरील ताण कमी होईल, असे छाच्छा यांनी म्हटले आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांना वाढत्या महागाईचा फटका बसत आहे. बाजारातील जवळपास सर्वच वस्तूंचे दर वाढले आहेत. इंधनाचे दर वाढल्यामुळे  महागाई वाढली आहे. परंतु, याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या बजेटवर होत आहे. परंतु, आगामी काळात इंधनाचे दर कमी होण्याची शक्यता  आहे. इंधनाचे दर कमी झाले तर महागाई देखील कमी होईल आणि सर्व सामांन्यांना वाढत्या महागाईपासून दिलासा मिळेल. 


महत्वाच्या बातम्या


Fisheries : देशात नील अर्थव्यवस्था राबवण्यासाठी राष्ट्रीय धोरण निश्चित करण्याचे काम सुरु, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांची माहिती 


भारताने सावरली अमेरिकेची अर्थव्यवस्था, तब्बल 2 लाख बेरोजगारांना दिली नोकरी