PM Kisan samman Nidhi Yojana : पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM Kisan samman Nidhi Yojana) योजनेचा 16 वा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते यवतमाळमधून या हप्त्याचं वितरण करण्यात आलं आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानचा 16 वा हप्ता जमा झाला नाही. तो नेमका का पोहोचला नाही. आता नेमकं शेतकऱ्यांनी काय करावं? याबाबत सविस्तर माहिती पाहुयात. 


PM किसान योजनेच्या हप्त्याची वाट पाहत असलेल्या कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये वर्ग करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांना ही भेट दिली. या वर्षातील हा पहिला आणि 16 वा हप्ता आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी या हप्त्याची वाट पाहत होते. पंतप्रधान किसान योजनेचे पैसे आल्याने करोडो शेतकरी आनंदी आहेत, तर काही शेतकरी असेही आहेत ज्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली नाही. असे शेतकरी नाराज आहेत. त्यांच्या खात्यात 2,000 रुपये का पोहोचले नाहीत हे समजू शकत नाही. अशा शेतकऱ्यांसाठी शासनाकडून एक सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे, ज्याद्वारे ते त्यांच्या समस्यांवर मात करू शकतात.


पीएम किसान योजनेचे पैसे तुमच्या खात्यात न पोहोचण्याची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये ई-केवायसी, तुमचे बँक खाते आधारशी लिंक न होणे आणि नाव किंवा कागदपत्रांमधील तफावत यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. जर तुम्ही सर्वकाही योग्यरित्या भरले असेल आणि तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्ही त्याबद्दल तक्रार करू शकता. सर्वप्रथम, तुम्ही पीएम किसान योजनेच्या वेबसाइटवर जाऊन तुमची स्थिती तपासू शकता, तुमच्या खात्यात पैसे का आले नाहीत याचे कारण येथे तुम्हाला कळेल.


या क्रमांकावर तुमची समस्या मांडा


जर तुमची स्थिती पूर्णपणे ठीक असेल आणि तरीही तुमच्या खात्यात रक्कम आली नसेल, तर तुम्ही pmkisan-ict@gov.in वर मेल पाठवून मदत मागू शकता. याशिवाय, तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधू शकता - 155261 आणि 1800115526, 011-23381092. येथे तुम्हाला मदत मिळेल आणि योजनेचे अडकलेले पैसे कसे मिळवायचे ते सांगितले जाईल.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते  16 वा हप्ता जारी केला. यामध्ये 21 हजार कोटी रुपये डीबीटीद्वारे करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आल्याची माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. देशातील 9 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर PM किसानच्या 16 वा हप्त्याचा निधी वितरीत करण्यात आला आहे. यापूर्वी, 15 वा हप्ता 15 नोव्हेंबर 2023 रोजी जारी करण्यात आला होता. तो देखील स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तेच वितरीत करण्यात आला होता. 


महत्वाच्या बातम्या:


PM किसानचा 16 वा हप्ता तुम्हाला मिळाला की नाही? कुठे कराल चेक