Moonlighting : मूनलाईटिंग हा आजकाल कंपन्यांमध्ये एक अतिशय लोकप्रिय शब्द बनला आहे. कंपनीच्या सीईओ पासून ते अगदी सामान्य कर्मचारी सर्वच मूनलायटिंग ची चर्चा करत आहेत. या नव्या संकल्पनेतून मोठा वाद देखील सध्या निर्माण झाला आहे. यामध्ये कंपन्यांच्या सीईओंसह वरिष्ठ अधिकारी या वादात सामील झाले आहेत. त्यामुळे अनेक कायदेशीर प्रश्नही निर्माण झाले आहेत.


'मूनलाइटिंग' बद्दल नाराजी
गेल्या आठवड्यात इन्फोसिसनं आपल्या कर्मचाऱ्यांना 'मूनलाइटिंग'बाबत गंभीर इशारा दिला आहे. कंपनीच्या मनुष्यबळ विभागानं (HR department) सर्व कर्मचाऱ्यांना मूनलाइटिंग संदर्भात ई-मेल पाठवला आहे. तसेच त्या ई- मेल मध्ये मूनलाइटिंग बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसं न  केल्यास शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते अस देखील या ई-मेल मध्ये म्हंटल आहे. अलीकडेच विप्रो'चे सर्वेसर्वा अझीम प्रेमजी यांनी देखील 'मूनलाइटिंग'बद्दल अलीकडंच नाराजी व्यक्त केली होती. पण हे सगळं होत असताना  फूड डिलिवरी क्षेत्रातील स्विगीने मात्र ऑगस्टमध्ये मूनलाइटिंग (Moonlighting) पॉलिसी आणली.


मूनलाइटिंग म्हणजे नक्की काय ?
गेल्या अनेक दिवसांपासून मूनलाइटिंगबद्दल चर्चा आहे. पण हे काही नवीन नाही अगदी पूर्वी पासून हे चालत आल आहे. मूनलाइटिंग म्हणजे नक्की काय हे आधी समजून घेऊया. तुम्हाला तुमच्या नौकरी च्या ठिकाणी जे काम नेमून दिलं आहे. म्हणजे तुमचा जॉब समजा १० ते ५ आहे आणि तो तुम्ही पूर्ण केला. पण त्याव्यतिरिक्त तुम्ही जे काही काम बाहेर करता त्यालाच मूनलाइटिंग म्हणतात. म्हणजे तुम्ही जॉबनंतर एक्स्ट्रा पैसे कमविण्यासाठी जी धडपड करतात जे कंपनीला माहिती नसते ते  मूनलाइटिंग मध्ये येत.नावाप्रमाणेच, मूनलाइटिंगचा अर्थ चंद्राच्या प्रकाशाखाली किंवा सामान्य कामकाजाच्या वेळेच्या बाहेर रात्रीच्या वेळी किंवा इतर वेळी केले जाणारे दुसरे काम.


यामध्ये फ्रीलान्सिंग येत का?
फ्रीलान्सिंग पूर्णपणे वेगळे आहे कारण फ्रीलांसर हे कोणत्याही कंपनीचे नियमित कर्मचारी नसतात त्यामुळे त्यांना नियमित वेतन नसते आणि कंपन्या त्यांना कामासाठी फक्त कामाचे देतात.  पण जेव्हा एखादा व्यक्ती नौकरी करून जर  फ्रीलान्सिंग करत असेल.  तर मग तेव्हा फ्रीलान्सिंग हा प्रकार देखील मूनलाइटिंग मध्ये बघता येऊ शकतो. मूनलाइटिंग वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या स्वरूपात अस्तित्वात आहे आणि पुढेही राहील. पण सध्या मात्र यावर जागतिक स्तरावर चर्चा होत आहे.


पूर्वीपासूनच होत आलं आहे मूनलाइटिंग...
ग्रामीण भागातील मूनलाइटिंग सांगायचं झालं तर जे पूर्वीपासून होत आल आहे. शिक्षक जे स्वतः चे क्लासेस चालवता किंवा एखादा व्यक्ती नौकरी करून नंतर स्वतः चे दुकान चालवतो हा देखील मूनलाइटिंग चा प्रकार म्हणता येईल. सध्या भारतात जे स्टार्टअप क्षेत्र वाढायला सुरुवात झाली त्याच मुख्य कारण मूनलाइटिंग हे आहे. अस अनेक तज्ञांच मत आहे. तसेच कोरोना काळात देखील अनेक लोकांना work from home असल्याने त्यांनी देखील मूनलाइटिंग मोठ्या प्रमाणत झाले.


मूनलाईटिंग हा प्रकार का वाढला ? 
मूनलाईटिंग हा प्रकार वाढला त्याच मुख्य कारण म्हणजे   कर्मचाऱ्यांना घर खर्च भागवण्यासाठी याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यामुळे हा प्रकार वाढला. तसेच आपली आवड जोपासण्यासाठी देखील अनेकांनी हा पर्याय बघितला. यावर काही दिवसांपूर्वी बोलताना इन्फोसिसचे माजी निर्देशक मोहनदास यांनी कमी वेतनामुळे हा प्रकार वाढल्याचे सांगितले आहे.