मुंबई : पुरुष असो की महिला, सर्वांनाच सोन्याचे दागिने परिधान करायला आवडतात. कोणत्याही सणाला लोक आवडीने सोन्याचे दागिने घालतात. सोन्याचा दागिना भेट मिळाल्यावर तर आपल्या आनंदाला पारावार उरत नाही. गुंतवणुकीच्या बाबतीतही सोने हा धातू सरसच आहे. पैशांची गुंतवणूक करायची असेल तर अनेकजण सोने खरेदी करतता. सोनं हे गोल्ड बॉण्ड, फिजिकल गोल्ड अशा वेगवेगळ्या रुपांत असतं. गुंतवणूक करायची असेल तर या दोन्ही मार्गांनी तुम्ही गुंतवणूक करू शकता. मात्र नेमकं कोणतं सोनं हे सर्वांत शुद्ध असतं. कोणत्या सोन्याचे दागिने करायला हवेत? कोणत्या सोन्यात पैशांची गुंतवणूक करावी? असे प्रश्न अनेकांना पडलेले असतात. याच पार्श्वभूमीवर आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या.. 


22 आणि 24 कॅरेट सोनं म्हणजे नेमकं काय?  


वजन मोजण्यासाठी किलो हे एकक आहे. पाणी मोजण्यासाठी लीटर या एककाचा वापर केला जातो. त्याच पद्धतीने सोन्याची शुद्धता मोजायची असेल तर कॅरेट या एककाचा वापर केला जातो. जेव्हे कॅरेट जास्त तेवढेच सोने शुद्ध असे मानले जाते. 24 कॅरेट सोने हे सर्वांत शुद्ध असल्याचे बोलले जाते. 24 कॅरेट सोनेच्या शुद्धता ही 99.9 टक्के असते. त्यामुळे या सोन्याचा भावही इतर सोन्याच्या तुलनेत अधिक असतो. 24, 22, 18, 14  अशा वेगवेगळ्या प्रकारचे सोने असते. 24 कॅरेट सोने वगळता इतर सर्व प्रकारच्या सोन्यात तांबे, चांदी असे इतर धातू मिसळले जातात. सोन्याच्या आभूषणांना मजबुती यावी म्हणून हे धातू सोन्यात मिसळले जातात. सोन्याची गुववत्ता ही बीआयएस या संस्थेतर्फे ठरली जाते. त्यामुळे हॉलमार्क असलेले सोनेच खरेदी करायला हवे, असा सल्ला दिला जातो.  


गुंतवणुकीसाठी कोणतं सोनं योग्य आहे? 


पैशांची गुंतवणूक करायची असलेल तर अनेक गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. सोने जेवढे शुद्ध असेल भविष्यात तुम्हाला तेवढेच जास्त पैसे मिळतील. याच कारणामुळे 24 कॅरेट सोन्याचा भाव आज दिवसेंदिवस वाढत आहे. भविष्यातही 24 कॅरेट सोन्याचा दर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पैशांच्या गुंतवणुकीसाठी 24 कॅरेट सोने हा सर्वोत्तम पर्याय आहे. पैशांच्या गुंतवणुकीसाठी 22 कॅरेट सोने हा पर्यायदेखील चांगला आहे.   


दागिन्यांसाठी कोणते सोने योग्य आहे? 


सोन्याचे आभूषणं करायची असतील  तर ते 24 कॅरेट सोन्यापासून तयार करता येत नाहीत. कारण 24 कॅरेट सोने हे फार नरम असते. ते लगेच तुटते. त्यामुळेच 22 कॅरेट किंवा त्यापेक्षा कमी कॅरेटच्या सोन्यापासून आभूषणं तयार करता येऊ शकतात. अशा सोन्यात तांबे, चांदी अशा प्रकारचे धातू मिसळले जातात.


हेही वाचा :


'या' पाच शेअर्सचा विषय खोल, पैसे गुंतवल्यास मिळू शकतात तब्बल 'इतके' टक्के रिटर्न्स!


सावधान! बँकेच्या 'या' नव्या नियमाकडे करू नका कानाडोळा, अन्यथा तुमचे बँक खाते थेट होईल बंद!


अक्षय्य तृतीयेनिमित्त बिनधास्त करा दागिन्यांची खरेदी, 'या' ज्वेलरी ब्रँड्सकडून मिळतायत जबरदस्त ऑफर्स!