मुंबई : बँकिंग क्षेत्रात रोज नवनवे नियम येतात. बँकांच्या कार्यप्रणालीतही छोटे-मोठे बदल होतच असतात. दरम्यान, पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank) आपल्या खातेदारांबाबतीत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भविष्यात होणारा गोंधळ, आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी बँकेने हे मह्त्त्वाचे पाऊल उचलले आहे. तुमचे या बँकेत खाते (Bank Account) असेल तर या बदललेल्या नियमाकडे सामान्य खातेधारकांनी लक्ष देणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचे बँक खाते थेट बंद होऊ शकते.
बँकेने नियमांत कोणता बदल केला?
ज्या ग्राहकांचे बँक खाते गेल्या तीन वर्षांपासून सक्रीय नाही, ज्या बँक खात्यात गेल्या तीन वर्षांपासून कोणत्याही प्रकारचे ट्रेन्झिशन झालेले नाही तसेच गेल्या तीन वर्षांपासून ज्या खात्यात पैसेही नाहीत, असे खाते पंजाब नॅशनल बँक थेट बंद करून टाकणार आहे. एका महिन्यानंतर या कारवाईला सुरुवात होणार आहे. सक्रीय नसलेल्या बँक खात्यांचा दुरूपयोग होऊ नये, म्हणून हा निर्णय घेण्यात येतोय, असं पंजाब नॅशनल बँकेनं सांगितलं आहे. 30 एप्रिल 2024 च्या आधीपासून हा तीन वर्षांचा कालावधी मोजली जाणार आहे. त्यानंतर सक्रिय नसलेली खाती बंद करण्यात येतील.
हे बँक खाते होणार नाहीत बदं
सक्रिय नसलेल्या बँक खात्यांवरच पंजाब नॅशनल बँक कारवाई करणार आहे. तसेच डी-मॅट अकाऊंटशी जोडलेले, स्टँडिंग इन्स्ट्रक्शन विथ अॅक्टिव्ह लॉकर, 25 वर्षांपेक्षा कमी वय असलेले खातेधारक, अल्पवयीन खातेधारक, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत चालू करण्यात आलेले खाते, पंतप्रधान जीवनज्योती विमा योजना, पीएणएसबीवाय, एपीवाय, टीबीटी या योजनांअंतर्गत चालू करण्यात आलेले बँक खातेदेखील बंद केले जाणार नाहीत. यासह न्यायालयात एखाद्या खटल्याशी संबंधित असलेले बँक खाते, प्राप्तिकर विभाग किंवा अन्य कोणत्याही शासकीय विभागाने दिलेल्या आदेशानुसार गोठवण्यात आलेले बँक खातेही बंद करण्यात येणार नाहीत.
दरम्यान, बँकेच्या या निर्णयामुळे ज्या लोकांचे बँक खाते सक्रीय नाहीत, अशांची डोकेदुखी वाढू शकते. त्यांनी लवकरत लवकर बँकेत जाऊन यासंदर्भातील माहिती जाणून घेतली पाहिजे. तसेच बँक खाते चालू राहावे यासाठी योग्य ती कारवाई केली पाहिजे.
हेही वाचा :
'या' पाच शेअर्सचा विषय खोल, पैसे गुंतवल्यास मिळू शकतात तब्बल 'इतके' टक्के रिटर्न्स!
ऑगस्टमध्ये BSNL ची 4 जी सेवा देशभरात चालू होणार, कंपनीकडून युद्धपातळीवर तयारी!