मुंबई : सध्या देशभरात लोकसभेची निवडणूक (Loksabha Election 2024) होत आहे. आतापर्यंत देशात निवडणुकीचे एकूण चार टप्पे जाले असून आणखी तीन टप्पे बाकी आहेत. पहिल्या तीन टप्प्यांत देशात कमी मतदान झाले. त्याचाच परिणाम म्हणून गेल्या आठवड्यात शेअर बाजार गडगडला. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे शेअर बाजारासंदर्भातील विधान आणि मतदानाच्या चौथ्या टप्प्यात मतदान वाढल्यामुळे शेअर बाजार सावरल्याचे दिसत आहे. दरम्यान, देशात विरोधकांच्या इंडिया आघाडीचे सरकार आल्यास शेअर बाजारात काय होणार? तसेच एनडीएचे सरकार आल्यावर कोणत्या कंपन्यांच्या शेअर्सला फायदा होणार? असे विचारले जात आहे. 


देशातील लोकसभा निवडणूक आणि या निवडणुकीच्या निकालानंतर भारताच्या शेअर बाजारावर नेमका काय परिणाम पडणार? याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न प्रभुदास लीलाधर या ब्रोकरेज कंपनीने केला आहे. या कंपनीने नुकतेच एक रिपोर्ट जारी केला असून कोणाची सत्ता आल्यावर कोणता शेअर वाढणार आणि कोणता शेअर कमी होणार? याबाबत या रिपोर्टमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. 


कोणाचेही सरकार येवो, हे क्षेत्र घेणार भरारी 


या रिपोर्टच्या म्हणण्यानुसार देशात कोणाचेही सरकार येवो एफएमसीजी, ऑटो, हेल्थकेअर, आयटी  सर्व्हिसे, खासगी बँका आणि कॅपिटल गुड्स या क्षेत्राशी संबंधित शेअर चांगली कामगिरी करतील. निवडणुकीचा निकाल काहीही येवो या क्षेत्रातील शेअर्स बाजाराला सावरण्याचं काम करतील.  


एनडीएचे सरकार आल्यास या क्षेत्रातील कंपन्यांना फायदा 


प्रभुदास लीलाधर (Prabhudas Lilladher) ने इंडिया स्ट्रॅटजी रिपोर्ट - मॅन्डेट 2024 ब्रेस फॉर व्होलॅटिलिटी नावाने हा रिपोर्ट तयार केला आहे. या रिपोर्टच्या म्हणण्यानुसार नरेंद्र मोदी पुन्हा एकदा सत्तेत आल्यास इन्फ्रास्टक्चर, डिफेन्स, कॅपिटल गुड्स, न्यू एनर्जी, पर्यटन यासारख्या क्षेत्रातील शेअर्स चांगली कामगिरी करतील. कन्झ्यूमर, टू-व्हीलर्स, ट्रॅक्टर्स कंपन्यांदेखील चांगली कामगिरी करू शकतात. 


इंडिया आघाडीची सत्ता आल्यास कोणत्या क्षेत्राला फायदा 


INDIA चे सरकार सत्तेत आल्यास मार्केटचं डी-रेटिंग होईल. डिफेन्स, कॅपिटल गुड्स, शासकीय बँका, डओन, असेट मॅनेजमेंट कंपन्या, वायर्स आणि केबल्स, प्लास्टिक पाईप्स, ईएमएस आदी सेक्टरला फायदा होईल. प्रभुदाल लीलाधर ब्रोकरेज फर्मच्या म्हणण्यानुसार एफएमसीजी, रिटेल, टू-व्हीलर्स, ट्रॅक्टर्स, रियल एस्टेट, ई-कॉमर्स शी संबंधित लॉजिस्टिक्स आदी क्षेत्रांना इंडिया आघाडीच्या नीतीचा फायदा होईल.  


सध्या बाजारात भीतीचे वातावरण 


या रिपोर्टनुसार गेल्या काही हफ्त्यांपासून शेअर बाराजात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. 2004 साली ज्या प्रमाणे भाजपला आश्चर्यकारकरित्या सत्ता मिळाली होती, तसेच काहीसे यावेळीही कोणत्याही एका गटाची सत्ता येण्याची शक्यता आहे. निवडणुकीत एनडीएचा विजय झाल्यास इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये अडाणी पोर्ट्स, एल अँड टी, डिफेन्स विभागात बीईएल, बीडी एल, बीईएमएल तसेच शासकीय तेल कंपन्यांना फाआयदा होणार आहे. इंडिया आघाडीचे सरकार आल्यास एचयूएल, डाबर, मेरिको, ब्रिटानिया, व्हीमार्ट, रिलेक्सो, रुपा, मारुती, सुझुकी, डीएलएफ आदी कंपन्यांना फायदा होईल.  


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


सुप्त ज्वालामुखीच्या शेजारी सोन्याचा मोठा खजिना, एका झटक्यात होऊ शकतो पाकिस्तान श्रीमंत!


2 लाखांचा विमा, 5 हजार पेन्शन; प्रिमियम 100 रुपयांच्या आत; पोस्ट ऑफिसच्या 'या' तीन योजनांत गुंतवणूक कराच!


मोदींनी 9 लाख गुंतवले, आता मिळणार 13 लाख रुपये, पोस्टाची 'ती' योजना आहे तरी काय?