Wadia Group May Completely Exit From Go First: सध्या तोट्यात असलेली आणि बजेट एअरलाईन्स म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'गो फर्स्ट'ची (Go First) मालकी असणाऱ्या वाडिया समुह मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. वाडिया समुह गो फर्स्टमधील मोठा हिस्सा विकण्याच्या किंवा पूर्णपणे बाहेर पडण्याच्या विचारात असल्याची माहिती मिळत आहे. तशी बोलणीही वाडिया समुहाकडून सुरू आहेत. यासंदर्भातील माहिती कंपनीतील सूत्रांनी दिली आहे. 


FY 2022 मधील आतापर्यंतचा सर्वाधिक आर्थिक तोटा


इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, गो फर्स्ट एअरलाईनला 2022 या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या काही महिन्यांपासून विमान कंपनीला ऑपरेशनल इश्यूजचा सामना करावा लागत आहे. सप्लाय चेनमधील समस्यांमुळे गो फर्स्ट (GoFirst) ची अर्धी विमानं ग्राउंड झाली आहेत. गेल्या काही महिन्यांत या विमान कंपनीला व्यवसायात खूप नुकसान झालं आहे.


वाडिया समुहाकडून 15 महिन्यांत 3000 कोटींची गुंतवणूक


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "GoFirst नं सुरुवातीला सरकारच्या इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम (ECLGS) अंतर्गत 600 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. याशिवाय, गेल्या 15 महिन्यांत वाडिया समूहानं एअरलाईन्समध्ये सुमारे 3000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. प्रमोटर्स आणि संभावित स्ट्रॅटेजिक पार्टनर्स यांच्यातील चर्चेची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "आम्ही आमच्या ग्राउंड केलेल्या विमानासाठी पैसे खर्च करत आहोत. विमानसेवा सुरू ठेवण्यासाठी आम्ही गेल्या 15 महिन्यांत 3000 कोटी रुपये खर्च केले आहेत." 


एअरलाईन्स बिजनेसमधून बाहेर पडणं हाच शेवटचा पर्याय 


उच्च अधिकारी म्हणाले की, "सर्व पर्यायांचा विचार करण्यात आला आहे आणि अनेक परिस्थितींचं नियोजन करण्यात आलं आहे. विमान व्यवसायातून बाहेर पडणं हा शेवटचा पर्याय असेल. आणखी एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "इंजिन पुरवठ्यातील समस्यांमुळे, सुमारे 60 टक्के GoFirst विमानं जमिनीवर आहेत, ज्यामुळे एअरलाईन्सचं मोठं नुकसान झालं आहे." एअरलाईन्सला प्रायमरी मार्केटमधून निधी उभारता आला नाही, कंपनीनं आयपीओ पुढे ढकलला होता. GoFirst नं मे 2021 मध्ये ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) दाखल केला. आयपीओद्वारे 3600 कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना होती.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


भविष्यातील संकटाचा सामना करण्यासाठी आजच करा तयारी, पण कशी? जाणून घ्या