Vodaphone-Idea : ब्रिटनची आघाडीची दूरसंचार कंपनी व्होडाफोनने (Vodafone) कर्जबाजारी व्होडाफोन आयडिया लिमिटेड (VI limited) मधील आपला हिस्सा 47.61 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. व्होडाफोनने आपल्या उपकंपनी प्राईम मेटल्सच्या माध्यमातून ही हिस्सेदारी वाढवली आहे. व्होडाफोन आयडिया लिमिटेड (VIL) मध्ये कंपनीचे यापूर्वी 44.39 टक्के स्टेक होते.


कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की, "प्राईम मेटल्स लिमिटेडकडे (PML) व्होडाफोन आयडिया लिमिटेडच्या 7.61 टक्के इक्विटी शेअर भांडवल किंवा 2,18,55,26,081 इक्विटी शेअर्स आहेत. PML ने कंपनीचे 570,958,646 इक्विटी शेअर्स प्राधान्य इश्यू अंतर्गत विकत घेतले आहेत.


4,500 कोटी रुपये या युनिट्सना प्रति शेअर


वोडाफोन आयडियाच्या संचालक मंडळाने गुरुवारी 3383 कोटी समभागांचे वाटप करण्यास मान्यता दिली. युरो पॅसिफिक सिक्युरिटीज, प्राईम मेटल्स आणि ओरियाना इन्व्हेस्टमेंट्स या तीन प्रवर्तक गटांना सुमारे 4,500 कोटी रुपये या युनिट्सना प्रति शेअर 13.30 रुपये दराने हे शेअर्स वाटप केले जातील. यानुसार 4,500 कोटी रूपये प्रति शेअर वाटप केले जातील. 


मंडळाने 14,500 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली


यापूर्वी मंडळाने 14,500 कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली होती. Vodafone Idea ने आदित्य बिर्ला ग्रुप (Aditya Birla group) आणि Vodafone Inc - प्रवर्तकांना प्राधान्य समभाग जारी करून रु. 4,500 कोटी उभारण्याची योजना आखली होती. वोडाफोन आणि आयडिया या दोन्ही आघाडीच्या कंपन्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha