900 Employees fires :  केवळ तीन मिनिटांच्या झूम कॉलमध्ये (Zoom Meeting) 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकणारा Better.com कंपनीचा बॉस विशाल गर्ग हा पुन्हा चर्चेत आला आहे आणि हाच बॉस यावेळी एकाच वेळी तीन हजार जणांना नोकरीवरुन काढून टाकू शकतो अशी माहिती आहे. कंपनीच्या पेरोल अॅपवरून कामगारांना याची माहिती मिळाली असल्याचं समजतंय.


ही घोषणा आज म्हणजेच बुधवारी जाहीर करण्यात येणार होती, मात्र चुकून सेव्हरेशन पे स्लिप आधीच लीक झाल्या होत्या आणि यावरून असे दिसून आले की Better.com ने 8 मार्च रोजी टाळेबंदीची योजना आखण्यात आली होती, परंतु जेव्हा तारखेची बातमी मीडियावर लीक झाली तेव्हा ती एक दिवस पुढे 9 मार्चपर्यंत ढकलण्यात आली.


अमेरिका आणि भारतात 8,000 कर्मचारी आहेत. यातील तीन हजार कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यास सांगण्यात येत आहे. असं कंपनीचे CFO केविन रायन यांनी कर्मचार्‍यांना ईमेल करत म्हटले आहे आणि कर्मचाऱ्यांना वाढते व्याजदर आणि बाजारातील अस्थिरतेच्या वातावरणाचं कारण पुढे करण्यात आलं


तो तीन मिनिटाचा कॉल काय होता?


विशाल गर्ग यांनी तीन महिन्यांपूर्वी 3 मिनिटांच्या झूम कॉलवर त्यांच्या 900 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याचे आदेश दिले होते आणि यावरून बराच वादही झाला होता. त्याचबरोबर गर्ग यांना न्यूयॉर्कमध्ये मुख्यालय असलेल्या डिजिटल मॉर्टगेज लेंडर बेटर डॉट कॉमच्या सीईओ पदावरून हटवण्याचीही चर्चा सुरू झाली होती.


Better.com कंपनीची माहिती


Better.com ची स्थापना 2016 मध्ये झाली आणि तिचे मुख्यालय न्यूयॉर्क शहरात आहे. हे एक ऑनलाइन व्यासपीठ आहे जे लोकांना तारण कर्ज आणि विमा उत्पादने प्रदान करते. Better.com ची गुंतवणूक सॉफ्ट बँक ऑफ जपानने केली आहे. त्याचे मूल्यांकन $7 अब्ज इतके आहे.


संबंधित बातम्या :


जशास तसं, Zoom वरुन 900 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, आता कंपनीनेही CEO ला धडा शिकवला!


900 जणांना नोकरीवरुन काढणाऱ्या बॉसला उपरती, माफी मागत म्हणाला...