Liquor Selling News : दिवसेंदिवस दारु विक्रीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दारु विक्रीतून (liquor sales) मोठी कमाई होत आहे. मिळालेल्या माहातीनुसार उत्तर प्रदेश सरकारने (Uttar Pradesh Govt) दारु विक्रीचा विक्रम केला आहे. युपी सरकारनं 2023-24 या आर्थिक वर्षात मद्यविक्रीतून मोठा नफा मिळवला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आर्थिक वर्षात युपी सरकारनं अंदाजे 47,600 कोटी रुपये मिळवले आहेत. हा आकडा मागील वर्षीच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे. जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
दर तासाला उत्तर प्रदेश सरकारनं कमावले 5.43 कोटी रुपये
दरवर्षी देशात मोठ्या प्रमाणावर दारु विकली जाते. यातून राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात पैसा देखील मिळतो. दारु विक्रीच्या बाबतीत उत्तर प्रदेश देशात आघाडीवर असणारं राज्य आहे. मागील वर्षी उत्तर प्रदेशनं 41,250 कोटी रुपयांची दारु विकली होती. यावर्षी यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. यावर्षी म्हणजे 2023-24 या आर्थिक वर्षात सरकारनं 47,600 कोटी रुपयांची दारु विकली आहे. म्हणजे दर तासाला उत्तर प्रदेश सरकारनं 5.43 कोटी रुपये कमावले आहेत. दिल्लीपेक्षा उत्तर प्रदेश दारु विक्रीत अव्वल आहे. सगळ्यात जास्त दारुचे ब्रँड देखील उत्तर प्रदेशातच मिळत आहेत.
ओव्हर रेटिंगच्या विरोधात कारवाई
दरम्यान, दारु विक्रीच्या व्यवसायाबद्दल ओव्हर रेटिंगचा मुद्दा सातत्यानं समोर येतो. ज्या ज्या ठिकाणी अशा घटना उघडकीस येतात, त्यावेळी त्या प्रकरणाची चौकशी करण्यात येते. तसेच दोषींवर कारवाई देखील करण्यात येण्याची माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आलीय. तसेच काही वेळेला बनावट दारु देखील केली जाते. तसेच काही राज्यातून उत्तर प्रदेशात अवैध दारुची देखील विक्री केली जाते, यावर देखील लक्ष ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली. दरम्यान, जर ओव्हर-रेटिंगसारख्या घटना कोणत्या निदर्शनास आल्या कर त्यांनी संबंधीत अधिकाऱ्याकडे याबाबत तक्रार करावी अशी माहिती देखीळ राज्य सरकारच्या वतीनं देण्यात आलीय.
महत्वाच्या बातम्या:
दारु विक्रीतून दिल्ली सरकारला दररोज किती कोटींचा महसूल मिळतो? दिल्लीत दारुची दुकानं किती?