Turmeric GST : अखंड स्वरूपात असलेल्या हळदीवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणाने Maharashtra Appellate Authority of Advance Ruling (AAAR) घेतला आहे. हळद हा शेतीमालच आहे, त्यामुळे त्यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात आलाय. जीएसटी लागू केल्याने हळदीच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे. परिणामी, जीएसटीमुळे हळदीचा रंग बेरंग होणार असल्याचे चिन्हे आहेत.
शेतकरी पिकवेली हळद काढून शिजवतात. त्यानंतर हळदीला पॉलिश केले जाते. अर्थात, हळद स्वच्छ केली जाते. त्यामुळे हळदीवर जीएसटी आकारु नये असा निर्णय राजीव कुमार मित्तल आणि अशोक कुमार मेहता या दोन जणांच्या खंडपीठाने दिला होता. CGST कायदा 2017, कलम 23 (1) (b) आणि 2 (107) नुसार दोन जणांच्या खंडपीठाने हळदीवरील जीएसटी बंद केला होता. पण आता महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणाने हळदीवर पाच टक्के जीएसटी लागू केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील सांगलीमधील व्यापारी नाराज होऊ शकतात.
प्राधिकरणाने हळदीवर 5 टक्के जीएसटी देय असल्याचे स्पष्ट केल्याने त्याचा थेट परिणाम हळदीच्या दरावर होणार आहे. हळदीच्या अडतदारांना मिळणाऱ्या कमिशनवरही जीएसटी भरावा लागणार असल्याचे आदेश प्राधिकरणाने दिले आहेत. त्यामुळे हळद व्यापाऱ्यांना सेवा कर भरण्याबाबत दिलेल्या नोटिसा कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, सांगली जिल्ह्यात हळदीचे मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. हळदीची बाजार पेठ सांगलीची प्रसिद्ध आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये निजामुद्दीन, शेलम अशा बाहेरच्या राज्यातून हळदीची आवक होत असते. हळद ही गुणकारी आहे. शिवाय स्वयंपाकात लग्नसराईत हळदीचा महत्वाचा भाग आहे. मागील दोन वर्षांपासून हळद हा शेतीमाल असल्याबाबतचा वाद सुरू होता. मात्र अखेर महाराष्ट्र अग्रिम अधिनिर्णय प्राधिकरणनाने हळदीला 5 टक्के जीएसटी लागू केला आहे.
Turmeric GST : अखंड स्वरूपात असलेल्या हळदीवर पाच टक्के जीएसटी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
11 Jun 2022 08:16 PM (IST)
Edited By: नामदेव कुंभार
Turmeric GST : हळद हा शेतीमालच आहे, त्यामुळे त्यावर पाच टक्के जीएसटी लावण्यात आलाय.
Turmeric
NEXT
PREV
संबंधित बातम्या
Published at:
11 Jun 2022 08:00 PM (IST)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -