मुंबई : नुकत्याच आलेल्या बजाज हाऊसिंग फायनान्स, पु ना गाडगीळ या आयपीओंनी गुंतवणूकदारांना दमदार रिटर्न्स दिले आहेत. या आयपीओत गुंतवणूक करणारांचे पैसे थेट दुप्पट झाले आहेत. दरम्यान, भारतीय भांडवली बाजाराची हीच स्थिती लक्षात घेऊन अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्याच्या तयारीत आहेत. अनेक कंपन्या आपले आयपीओ घेऊन येत आहेत. या आठवड्यात तब्बल 11 आयपीओ येणार आहेत. या आयपीओंच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना बम्पर रिटर्न्स मिळवण्याची उत्तम संधी मिळणार आहे.


या आठवड्यात एकूण 11 आयपीओ येणार


भारतीय भांडवली बाजारात पुढच्या पाच दिवसांत 11 नवे आयपीओ येणार आहेत. यातील काही आयपीओ हे मेनबोर्ड तर काही आयपीओ हे एसएमई सेगमेंटचे आहेत. आईपीओ कॅलेंडरनुसार या आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुल्या होणाऱ्या आयपीओंमध्ये मनबा फायनान्स आणि केआरएन हीट एक्स्चेंजर हे दोन प्रमुख आयपीओ आहेत. हे दोन्ही मेनबोर्ड सेगमेंटचे आयपीओ आहेत. आयपीओच्या माध्यमातून या दोन्ही कंपन्या साधारण 482 कोटी रुपये उभे करणार आहेत. 


मनबा फायनान्सचा आयपीओ येणार


मनबा फायनान्सचा आयपीओ हा 150.84 कोटी रुपयांचा असून तो 23 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 25 सप्टेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओचा किंमत पट्टा (प्राईस बँड) 114 ते 120 रुपये आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 125 शेअर्स आहेत. तर दुसरीकडे केआरएन हीट एक्सचेंजर हा आयपीओ 341.95 कोटी रुपयांचा असणार आहे. हा आयपीओ 25 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 27  सप्टेंबरपर्यंत या आयपीओत गुंतवणूक करता येणार आहे. या आयपीओच्या एका लॉटमध्ये 65 शेअर्स असणार आहेत. तर प्रत्येक शेअरचा किंमत पट्टा हा 209 ते 220 रुपये असू शकतो. 


एसएमई सेगमेंटमध्ये येणार 9 आयपीओ


या आठवड्यात एसएमई सेगमेंटमध्येही एकूण 9 आयपीओ येणार आहेत. यातील रॅपिड वॉल्व्स हा पहिला आपयीओ 23 सप्टेंबर रोजी गुंतवणुकीसाठी खुला होणार असून ही कंपनी एकूण 30.41 कोटी रुपये उभे करणार आहे. तर याच दिवशी 3डी इंडिया हा आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार असून ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 25.56 कोटी रुपये उभे करणार आहे. 25 सप्टेंबर रोजी थिंकिंग हॅट्स एंटरटेनमेंट सोल्यूशन्स हा आयपीओ येणार आहे. ही कंपनी आयपीओच्या माध्यमातून 15.09 कोटी रुपये उभे करणार आहे. याच दिवशी 31.32 कोटी रुपयांचा यूनिलेक्स कलर्स अँड केमिकल्स तसेच 35.90  कोटी रपयांचा टेकइरा इंजीनिअरिंग हे दोन आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. 26 सप्टेंबर रोजी  फॉर्ज ऑटो हा 31.10 कोटी रुपयांचा आयपीओ येणार आहे. याच दिवशी सहस्र इलेक्ट्रॉनिक्स सोल्यूशन्स (186.16 कोटी रुपये) तसेच दिव्यधन रिसायक्लिंग इंडस्ट्रीज (24.17 कोटी रुपये) हे आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होतील.  तर 27 सप्टेंबर रोजी 27.63 कोटी रुपयांचा साज हॉटल्स आयपीओ गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. 


अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होणार 


याच आठवड्यात एकूण 11 आयपीओ गुंतवणुकीसाठी खुले होणार आहेत. तर दुसरीकडे याच आठवड्यात अनेक कंपन्या शेअर बाजारावर सूचिबद्ध होण्यासाठी तयार आहेत. यात मेनबोर्ड सेगमेंटवर वेस्टर्न करिअर्स, आर्केड डेव्हलपर्स आणि नदर्न आर्क कॅपिटल यांच्या समावेश आहे.  तर एसएमई सेगमेंटमध्ये पॉप्यूलर फाउंडेशन, डेक्कन ट्रांसकॉन लीजिंग, एनवायरटेक सिस्टम्स, पेलाट्रो लिमिटेड, ओसेल डिव्हाइसेज, पॅरामाउंट स्पेशियालिटी फॉर्जिंग्स, कलाना इस्पात, अवि अंश टेक्सटाइल, फीनिक्स ओव्हसीज, एसडी रिटेल आणि बाइकवो ग्रीनटेक या कंपन्यांचा समावेश आहे.


हेही वाचा :


लवकरच येणार भारतातील सर्वांत मोठा हॉटेल आयपीओ, पुन्हा एकदा भरपूर पैसे कमवण्याची संधी!


आयपीओची चर्चा चालू असतानाच आता OYO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट अमेरिकेची हॉटेल कंपनी खरेदी करणार!