गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात चांगलीच तेजी पाहायला मिळत आहे. दुसरीकडे काही आयपीओंनीही दमदार कामगिरी केली आहे. बजाज हाऊसिंग फायनान्स, पीएनजी गाडगीळ या आयपीओंनी गुंतवणूकदारांना थेट दुप्पट रिटर्न्स दिले आहेत. याच कारणामुळे सध्या नव्याने येणाऱ्या आयपीओंवर सर्वांची नजर आहे. असे असतानाच आता हॉटेल क्षेत्रात काम करणाऱ्या एका दमदार कंपनीचा आयपीओ येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार आयपीओच्या माध्यमातून ही कंपनी तब्बल 4000 कोटी रुपये उभे करणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार लवकरच आयपीओ घेऊन येणाऱ्या या कंपनीचे नाव Leela Hotels असे आहे. हा आयपीओ आलाच तर तो हॉटेल क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा आयपीओ ठरू शकतो. लीला हॉटेल्स या कंपनीच्या पालक कंपनीचे नाव Schloss Bangalore असे आहे. या कंपनीने लीली हॉटेल्सच्या आयपीओच्या मंजुरीसाठी सेबीकडे अर्ज केला आहे. 


भारताचा सर्वांत मोठा हॉटेल आयपीओ ठरणार 


या आयपीओसंदर्भात मनीकंट्रोल या अर्थविषक वृत्तसंकेतस्थळाने सविस्तर माहिती दिली आहे. Schloss Bangalore या कंपनीकडून लीला पॅलेसेज, हॉटेल अँड रिसॉर्ट्स चालले जाते. ही कंपनी लीला हॉटेल्सच्या आयपीओच्या माध्यमातून 5 हजार कोटी रुपये उभे करणार आहे. असे झाल्यास हा आयपीओ हॉटेल क्षेत्रातील सर्वांत मोठा आयपीओ ठरणार आहे. 


आयपीओत 3000 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स 


मिळालेल्या माहितीनुसार लीला हॉटल्सच्या प्रस्तावित आयपीमध्ये एकूण 3000 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर्स असतील. तर सध्याचे शेअरहोल्डर्स या आयपीओत 2 हजार कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून विकणार आहेत. 


8 नवे हॉटेल्स चालू करण्याची योजना  


आयपीओच्या माध्यमातून मिळालेल्या पैशांतून ही कंपनी आणखी काही शहरांत नवे हॉटेल्स उभारणार आहे. ही कंपनी सध्या 10 शहरांत 12 हॉटेल्स चालवत आहे. 2028 पर्यंत ही कंपनी 8 नवे हॉटेल्स चालू करण्याच्या तयारीत आहे. 


लीला हॉटल्सच्या आयपीओच्या देखरेखीची जबाबदारी एकूण 11 बँकांवर सोपवण्यात आली आहे. यामध्ये कोटक महिंद्रा कॅपिटल, जेएम फायनान्शियल, बोफा सिक्योरिटीज, मॉर्गन स्टेनली, जेपी मॉर्गन, अॅक्सिस कॅपिटल, सिटी, आयसीआयसीआय सिक्योरिटीज, आयआयएफएल कॅपिटल, मोतीलाल ओस्वाल आणि एसबीआय कॅप्स यांचा समावेश आहे. 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


पैसे कमवण्याची पुन्हा मोठी संधी! बड्या कंपनीचा तब्बल 7000 कोटींचा तगडा आयपीओ येणार


आयपीओची चर्चा चालू असतानाच आता OYO मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, थेट अमेरिकेची हॉटेल कंपनी खरेदी करणार!


Mhada Lottery 2024 : म्हाडाचा मुदतवाढीचा निर्णय गेमचेंजर ठरला, मुंबईतील घरांसाठी लाखांहून अधिक अर्ज, जाणून घ्या आकडेवारी