मुंबई : भारतातील ओयो ही कंपनी लवकरच आपला आयपीओ (OYO IPO) घेऊन येणार आहे. या आयपीओसाठी कंपनीकडून तयारी चालू आहे. याच कारणामुळे गेल्या काही दिवसांपासून ही कंपनी चांगलीच चर्चेत आहे. एकीकडे ही चर्चा चालू असतानाच दुसरीकडे या कंपनीने देशाबाहेर आपला विस्तार करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ओयो ही कंपनी अमरिकेत एक मोठी हॉटेल कंपनी खरेदी करणार आहे.
कोणत्या कंपनली खरेदी करणार?
पीटीआय या वृत्तसंस्थेने याबाबत सविस्तर वृत्त दिलेले आहे. या वृत्तानुसार ओयो या कंपनीच पालक कंपनवी ओरावेल स्टेज या कंपनीने संबंधित व्यवहाराबाबत अधिक माहिती दिली आहे. ओयो लवकरच अमेरिकेतील जी6 हॉस्पिटलिटी ही कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. जी6 हॉस्पिटलिटी ही कंपनी अमेरिकेत मोटल 6 आणि स्टुडिओ 6 या ब्रँडच्या नावाने व्यवसाय करते. मोटल 6 आणि स्टुडिओ 6 या अमेरिकेतील आयकॉनिक ब्रँड बजेट हॉटेल्स म्हणून ओळखल्या जातात.
525 दशलक्ष डॉलर्सचा व्यवहार होणार?
मिळालेल्या माहितीनुसार ओयो ही कंपनी वर नमूद केलेल्या हॉटेल्स 525 दशलक्ष डॉलर्सना खरेदी करण्याच्या तयारीत आहे. या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत हा व्यवहार पूर्णत्त्वास जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कायदेशीर मंजुरी मिळाल्यानंतर ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 या काळात हा व्यवहार पूर्ण होण्याची शक्यता आहे.
2019 सालापासून अमेरिकेत व्यवसाय
ओयो या हॉटेल कंपनीने अगोदरच अमेरिकेत आपला विस्तार केलेला आहे. 2019 सालापासून ओयोने अमरिकेच्या बाजारपेठेत पाऊल ठेवलेले आहे. या कंपनीने गेल्या वर्षात सधारण 100 हॉटेल्सशी स्वत:ला जोडून घेतलेले आहे. सध्या ओयो या ब्रँडशी अमेरिकेतील 35 तसेच वेगवेगळ्या राज्यातील 320 पेक्षा जास्त हॉटेल्स जोडल्या गेलेल्या आहेत. या वर्षी ओयो अमेरिकेतील आणखी 250 हॉटेल्सना स्वत:शी जोडून घेणार आहे.
नव्या करारानंतर फायदा होणार का?
जी6 हॉस्पिटॅलिटी ला खरेदी केल्यानंतर अमेरिकेत विस्तार करण्याची चांगली संधी निर्माण होईल, असे ओयोला वाटत आहे. मोटल6 या ब्रँडच्या फ्रेंचायझी नेटवर्कचा जी6 हॉस्पिटॅलिटीला मोठा फायदा होतो. त्यामुळे भविष्यात आम्हालाही हा फायदा होईल, अशी अपेक्षा ओयो व्यवस्थापनाकडून केली जात आहे.
हेही वाचा :
NPS वात्सल्य की PPF? कोणती योजना तुम्हाला लवकर करोडपती बनवेल? जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर
मुंबईत सोन्यासह हिऱ्यांची तस्करी, मुंबई कस्टमकडून 3 प्रवाशांना अटक, 3.12 कोटी रुपयांचा माल जप्त