Tomato Price News : सध्या टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी (Tomato Farmers) चांगले दिवस आहेत. कारण सातत्यानं टोमॅटोच्या दरात (Tomato Price) वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना (Farmers) होत आहे. मात्र, दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला वाढत्या दराचा फटका बसत आहे. दरम्यान, एका बाजूला सरकारनं कमी दरात टोमॅटोची विक्री सुरु करुन देखील दिल्लीत टोमॅटोच्या दरात वाढ होतेय. दिल्लीत सध्या टोमॅटोचे दर हे 100 रुपयांच्या पुढे गेले आहेत. 


टोमॅटोचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने काही शहरांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली आहे. असे असले तरीदेखील दरात वाढ होताना दिसत आहे. हवामानाचा मोठा फटका टोमॅटो पिकाला बसला आहे. देशातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळं वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर दुसरीकडे पिकाचं मोठं नकसान झालं आहे. त्यामुळं टोमॅटोच्या दरात मोठी वाढ होत आहे. पुढच्या काळात आणखी टोमॅटोच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. 


हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस, पिकावर मोठा परिणाम 


हिमाचल प्रदेशातील मुसळधार पावसाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होऊ शकतो. त्यामुळx त्यांच्या स्वयंपाकघरातील बजेट विस्कळीत होऊ शकते. हिमाचल प्रदेशातील पावसामुळं राष्ट्रीय राजधानी दिल्लीत टोमॅटोचे किरकोळ भाव पुन्हा एकदा 100 रुपये प्रतिकिलोच्या आसपास आहेत. दिल्लीत टोमॅटोच्या दराने यंदाच्या हंगामात एकदा शतक गाठले आहे. गेल्या महिन्यात दिल्लीच्या किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 100 रुपये ते 120 रुपये किलोवर पोहोचले होते. दिल्लीतील मदर डेअरीच्या सफाल या दुकानात टोमॅटो 100 रुपये किलो दराने विकला जात होता. त्याचवेळी सफाल आउटलेट्स व्यतिरिक्त असंघटित किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर 100 ते 120 रुपये किलोपर्यंत पोहोचले होते.


टोमॅटोचे दर कमी करण्याचे सरकारचे प्रयत्न 


सरकारच्या प्रयत्नांमुळे टोमॅटोचे भाव आटोक्यात येण्यास मदत झाली. सरकारने NCCF सारख्या सहकारी संस्थांच्या मदतीने दिल्लीत अनेक ठिकाणी अनुदानित दरात टोमॅटो उपलब्ध करुन देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळं भाव काही प्रमाणात खाली आले. सरकारी आकडेवारीनुसार, सध्या दिल्लीत टोमॅटोचे किरकोळ दर 70 रुपये प्रति किलोच्या आसपास आहेत, तर आर्थिक राजधानी मुंबईत किरकोळ किंमत 80 रुपये प्रति किलो आहे. नॅशनल को-ऑपरेटिव्ह कन्झ्युमर्स फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) दिल्लीतील अनेक ठिकाणी टोमॅटो 60 रुपये प्रति किलो या सवलतीच्या दराने विकत आहे. एनसीसीएफच्या पुढाकारामुळे किंमती आटोक्यात आणल्या जात आहेत. मात्र, पावसामुळे भाव पुन्हा 100 रुपयांच्या पुढे जाण्याचा धोका आहे. टोमॅटो लवकरच पुन्हा शतक ठोकेल अशी भीती व्यापाऱ्यांना आहे.


मागील वर्षी  प्रतिकिलो टोमॅटोचा दर हा 350 रुपयांवर 


मागील वर्षा या महिन्यांत टोमॅटोच्या दरात वाढ दिसून येत होती. गतवर्षी परिस्थिती खूपच बिकट झाली होती, किरकोळ बाजारात टोमॅटोचा भाव 350 रुपये किलोवर पोहोचला होता. त्यानंतर सरकारने सहकारी संस्थांच्या मदतीने अनेक शहरांमध्ये सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केली.


महत्वाच्या बातम्या:


Tomato Prices: टोमॅटोची 'लाली' वाढली, प्रतिकिलोसाठी मोजावे लागतायेत 'एवढे' पैसे, शेतकऱ्यांना मोठा फायदा