नवी दिल्ली : भारतानं आशिया चषकाच्या अंतिम फेरीत 5 विकेटनं पाकिस्तानला पराभूत केलं.  रोमांचक अशा सामन्यात भारतानं पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. भारतानं आशिया चषक सुरु झाल्यापासून नवव्यांदा विजेतेपद मिळवलं आहे. भारताच्या पाकिस्तानवरील विजयाचा शिल्पकार तिलक वर्मा ठरला.  तिलक वर्मानं भारताची अवस्था 3 बाद 20 धावा असताना मैदानात फलंदाजीसाठी प्रवेश केला होता. विजयापर्यंत नाबाद राहत तिलक वर्मानं आशिया चषक भारताला मिळवून दिला. तिलक वर्मानं नाबाद 69 धावा करत टीमला विजय मिळवून दिला. 

Continues below advertisement

Tilak Verma Networth : तिलक वर्माची नेटवर्थ किती?

तिलक वर्माच्या नेटवर्थचा विचार केला असता तो कोट्याधीश आहे. तिलक वर्माला क्रिकेट मधून मिळणाऱ्या उत्पन्नासह, ब्रँड प्रमोशनमधून देखील पैसे मिळतात. 

तिलक  वर्मानं आयपीएलमध्ये देखील दमदार कामगिरी केलेली आहे. त्यानं आशिया चषकात पाकिस्तान विरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी भारताला विजय मिळवून दिला आहे. मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या तिलक वर्माची संपत्ती देखील वेगानं वाढत आहे.तिलक वर्मा 2022 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळत होता. 2025 च्या आयपीएलमध्ये देखील तो मुंबईकडून खेळला.. नेटवर्थचा विचार केला असता एका रिपोर्टनुसार फेब्रुवारी 2025 पर्यंत त्याची नेटवर्थ 5 कोटी रुपये होती. मार्चमध्ये आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सनं त्याला 8 कोटी रुपयांना रिटेन केलं होतं. त्यामुळं त्याच्या संपत्तीत वाढ झाली आहे. 

Continues below advertisement

तिलक वर्माच्या एकूण उत्पन्नात त्याला बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पगाराचा वाटा अधिक आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून तिलक वर्माला सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्ट मध्ये सी ग्रेडमध्ये ठेवलं आहे. त्यानुसार त्यांना एका मॅचससाठी 1 त्याला 1 कोटी रुपये मिळतात.  वनडेसाठी 6 लाख तर टी 20 सामन्यासाठी त्याला 3 लाख रुपये मिळतात. 

तिलक वर्मा याशिवाय ब्रँड प्रमोशनमधून चांगले पैसे कमावतो.तिलक एनर्जी ड्रिंक्स, एनर्जी ट्रिंग बुस्ट, एसएएस , ईबाईकगो आणि ड्रीम इलेव्हनच्या जाहिरातीत तो दिसला आहे.

तिलक वर्मानं कमी काळात क्रिकेटमध्ये त्याची ओळख निर्माण केली आहे. हैरदाबादच्या चंद्रयान गुट्टा भागात त्याचं अलिशान घर आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या कंपन्यांच्या अलिशान कार आहेत. यात मर्सिडिज बेंझ-S- क्लास आणि एक BMW-7 सीरिजची कार आहे.