Indian rupee : देशांतर्गत समभागांच्या कमजोरीमुळे आज भारतीय रुपया (Indian rupee) डॉलरच्या तुलनेत नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर आला. जागतिक क्रूडच्या किमतीत वाढ झाल्याचा परिणाम देशांतर्गत चलनावरही झाला. मंगळवारी रुपयाने 41 पैशांनी घसरण करत यूएस डॉलरच्या तुलनेत 78.78 च्या इंट्रा-डे विक्रमी नीचांकी पातळी गाठली.


आंतरबँक परकीय चलनात, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 78.53 वर उघडला. नंतर आणखी घसरला आणि शेवटच्या बंदच्या तुलनेत 41 पैशांची घसरण नोंदवून, 78.78 च्या इंट्रा-डे विक्रमी नीचांकी पातळीवर पोहोचला. सोमवारी, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 4 पैशांनी घसरून 78.37 च्या जीवनकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला.


“भारतीय रुपयाने डॉलर निर्देशांकाच्या तुलनेत नवीन विक्रमी नीचांकी पातळी गाठली, इक्विटी बाजारात सतत विक्री आणि कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे, ज्यामुळे निव्वळ आयातदाराच्या आर्थिक शिल्लकवर तोल येऊ शकतो. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाईच्या मुद्यावर  पुन्हा एकदा चिंता निर्माण झाली आहे, ज्यामुळे मध्यवर्ती बँका दर वाढवण्याबाबत खूप आक्रमक होऊ शकतात आणि त्यामुळे मंदी येऊ शकते, अशी प्रतिक्रिया संशोधन विश्लेषक- कमोडिटीज अँड करन्सीज फंडामेंटल, आनंद राठी शेअर्स आणि स्टॉक ब्रोकरचे  जिगर त्रिवेदी यांनी दिली आहे. 


यावर्षी भारतीय रुपयाच्या तुलनेत डॉलरची किंमत जवळपास ६ टक्यांनी वाढली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत  आज सलग तिसऱ्या दिवशी कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्या आहेत. प्रमुख तेल उत्पादक सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती उत्पादनात लक्षणीय वाढ करू शकतील अशी शक्यता दिसत नसल्याचे चित्र आहे, तर लिबिया आणि इक्वाडोरमधील राजकीय अशांततेने त्या पुरवठ्याच्या चिंतेमध्ये भर पडली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या