Maharashtra political crisis : महाराष्ट्रात सुर असलेल्या अभूत सत्तासंघर्षाची कोंडी अजूनही फुटली नसली, तरी शिंदे गट आणि भाजपकडून सुरू झालेल्या पडद्यामागील घडामोडींनी वेग घेतला आहे. त्यामुळे शिंदे गट भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे.
शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी एबीपी माझाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लवकरात महाराष्ट्रात परतणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारकडे फ्लोअर टेस्ट घेण्याची मागणी केली. अनुभवी शरद पवार आपल्यासोबत आहेत, तर सरकारने फ्लोअर टेस्ट करावी, किती दिवस रस्त्यावरची लढाई लढणार अशी विचारणा त्यांनी केली. हे अति झाल्याचे केसरकर म्हणाले.
राज्यात इमोशनल ब्लॅकमेलिंग सुरु
राज्यात सध्या इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याचा आरोप केसरकर यांनी केला. राज्यात परतल्यानंतर 21 आमदार त्यांना मतदार करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगितले जात आहे, पण फक्त 21 जणांचेच त्यांच्यावर प्रेम आहे असे काही नसून 51 जणांचे प्रेम आहे. जर त्यांच्या बाजूने आमदार असतील, तर गुवाहाटीला येण्याची व्यवस्था करा, आम्ही त्यांना पाठवून देऊ, आमची कोणाकडे जबरदस्ती नाही. मी सर्व आमदारांच्या बाजूने बोलत आहे. सर्व आमदारांचा राऊतांविरोधात रोष असल्याचा ते म्हणाले. आम्ही युतीचे आमदार निवडून आलो असल्याचे ते म्हणाले. युती तुटल्यानंतर भाजप रस्त्यावर आला नाही, तर तुम्ही का येता असेही ते म्हणाले.
केसरकरांकडून राणे कुटुंबीयांची पाठराखण
मोदींच्या व्यक्तीमत्वांचेही केसरकर यांनी जोरदार कौतुक केले. केसरकर यांनी भाजपची पाठराखण करतानाच नारायण राणे यांच्या कुटुबीयांचीही पाठराखण केली. राऊत टीका करत राहणार आणि समोर काहीच प्रतिक्रिया येणार नाही असे होते का? अशी अपेक्षा तुम्ही करता? पक्षाच्या व्यासपीठावर जेव्हा राणे साहेबांना घेतलं गेल त्यावेळी मला माझ्या भाजपमधील जवळच्या मित्रांनी सांगितले होते की, 85 टक्के लोकांनी त्यांना (राणेंना) आमच्या व्यासपीठावरून मातोश्रीची बदनामी करू नका असे सांगितले होते. त्यामुळे 85 टक्के लोकांचा विचार करणार की एका व्यक्तीचा विचार करणार ? ज्यांनी तुमची बदनामी केली. तुमचे चांगले संबंध आहेत, तर तुम्ही का नाही जाऊन सांगितले अशी विचारणा केसरकर यांनी केली. राजकारणात अॅक्शनला रिअॅक्शन येत असते, असे सांगत त्यांनी राणे कुटुंबाची पाठराखण केली.