Business News : देशातील सर्वात मोठी असलेली टाटा समुहाची आयटी कंपनी Tata Consultancy Services (TCS) च्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कंपनीने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपनीने 3 महिन्यांत 12 हजार कोटी रुपये मिळवले आहेत. यानंतर कंपनीने गुंतवणूकदारांना लाभांशही जाहीर केला आहे. तुम्हीही TCS शेअर्समध्ये गुंतवणूक केली असेल तर तुम्हालाही लाभांशाची रक्कम मिळेल.


गुंतवणूकदारांना लाभांश जाहीर


देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी TCS ने पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. TCS च्या उत्पन्नात तिमाही दर तिमाही आधारावर 2.2 टक्क्यांची वाढ झाली आहे. पहिल्या 3 महिन्यात कंपनीने आपली ताकद दाखवून दिली आहे. आयटी कंपनीने 3 महिन्यांत 12000 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. त्यानंतर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे. मात्र, या काळात कंपनीने काही गोष्टींमध्ये निराशाही केली आहे. Q1 निकालानुसार, कंपनीचे उत्पन्न आणि निव्वळ नफा अपेक्षेपेक्षा किंचित कमी होता. त्याचवेळी, EBIT मध्ये देखील घट झाली आहे. TCS ने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 10 रुपये लाभांश जाहीर केला आहे.


लाभांश कधी मिळणार?


टाटा ग्रुप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना खुशखबर दिली आहे. कंपनीने 1 रुपयाच्या दर्शनी मूल्यावर प्रति शेअर 10 रुपये (1000%) अंतरिम लाभांश जाहीर केला आहे. 2024-25 या आर्थिक वर्षातील हा पहिला लाभांश आहे. TCS लाभांशासाठी, रेकॉर्ड तारीख 20 जुलै असेल आणि पेमेंटची तारीख 5 ऑगस्ट असणार आहे. गुरुवारी, TCS चे शेअर्स NSE वर 0.18 टक्क्यांच्या घसरणीसह 3,902 रुपयांवर बंद झाले. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 4,254.75 रुपये आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या वर्षभरात 19.24 टक्के वाढ झाली आहे. 




TCS कंपनी 46 देशांमध्ये 150 ठिकाणी कार्यरत


टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ( TCS ) ही एक भारतीयबहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान (IT) सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. ज्याचे मुख्यालय मुंबईत आहे. हा टाटा समूहाचा एक भाग आहे आणि 46 देशांमध्ये 150 ठिकाणी कार्यरत आहे. मार्च 2024 मध्ये, TCS चे जगभरात 601,546 पेक्षा जास्त कर्मचारी असल्याची नोंद करण्यात आली. गेल्या अनेक दिवसांपासून टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनीला मोठा नफा होत आहे. आता कंपनीला फक्त 3 महिन्यातच 12 हजार कोटी रुपयांचा नफा झाला आहे. दरम्यान, या नफ्यानंतर गुंतवणूकदारांना देखील फायदा मिळणार आहे, कंपनीने लाभांश जाहीर केला आहे. 






 




महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! TCS मध्ये नोकरकपात होणार नाही, लवकरच आणखी भरती होणार