Tata Power Shares : आजही शेअर बाजारात टाटा शेअरची (Tata Power Share) चांगलीच घोडदौड सुरु आहे. आज हा स्टॉक इंट्राडेमध्ये 6 टक्क्यांहून अधिक वाढून 292 रुपयांपर्यंत पोहोचला होता. मंगळवारी स्टॉक 236 रुपयांवर बंद झाला. टाटा शेअरची तेजी कायम आहे. हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट झाले आहेत. ब्रोकरेज हाऊस आणि  सिक्युरिटीजने (ICICI) भारतीय हॉटेल्समध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला आहे. हॉटेल उद्योगाच्या मागणीत वाढ होणार असल्याचं ब्रोकरेज हाऊसनं म्हटलं आहे. 


चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत भोगवटा दर 70 टक्क्यांच्या पुढे जाऊ शकतो. याचा फायदा भारतीय हॉटेल्सना होणार आहे. बाजारातील दिग्गज राकेश झुनझुनवाला यांनीही टाटाचे शेअर्स खरेदी केले आहेत. टाटा समूहाच्या कंपन्याचे शेअर बाजारात चांगली कामगिरी करत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळत आहे. 


तेजस नेटवर्क शेअर, त्यापैकी एक, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) मध्ये सलग पाचव्या सत्रात 5% वरच्या सर्किटला धडकला. सांख्य लॅब्सच्या अधिग्रहणाच्या बातम्या येण्याचे कारण म्हणजे स्टॉकमधील सततची उसळी. या टाटा कंपनीने नुकतीच याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. तुम्हाला सांगतो, मंगळवारी कंपनीची प्रति शेअर किंमत BSE वर 493 रुपयांवर गेली होती.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha