Tata Motors Price Hike : देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सने मोठा निर्णय घेतला आहे. टाटा मोटार्स त्यांच्या वाहनांच्या किंमतीत वाढ करणार आहे. त्यामुळं वाहन खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला मोठी झळ लागणार आहे. दरम्यान, या नवीन किंमती 1 जानेवारी 2025 पासून म्हणजे नवीन वर्षापासून लागू करण्यात येणार आहेत.  


ट्रक आणि बसेसच्या किंमतीत वाढ होणार आहे. या वाढलेल्या किमती 1 जानेवारी 2025 पासून लागू होतील. या घोषणेअंतर्गत टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किंमतीत 2 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाहनांच्या नवीन किमती नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू होतील. नवीन वर्षापूर्वीच काही वाहन कंपन्यांनी किमती वाढवण्याची घोषणा केली असून त्यात टाटा मोटर्सही सामील झाली आहे.


टाटा मोटर्सने वाहनांच्या किंमती का वाढवल्या?


कंपनीच्या वाहनांच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे ही किंमत वाढवली जात असल्याची माहिती टाटा मोटर्सने दिली आहे. याबाबत ग्राहकांवर कमीत कमी बोजा टाकण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे. कंपनीने असेही सांगितले की या दरवाढीचा परिणाम टाटा मोटर्सच्या सर्व ट्रक आणि बस मॉडेल्सवर दिसून येईल, जरी ही वाढ वेगवेगळ्या बस आणि ट्रकच्या मॉडेल्सवर भिन्न असेल.


मारुती आणि ह्युंदाईनेही वाहनांच्या दरवाढीची केली घोषणा 


प्रवासी वाहन निर्मात्या मारुती सुझुकी, ह्युंदाई मोटर इंडिया आणि टाटा मोटर्सने आधीच त्यांच्या कारच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. याशिवाय लक्झरी कार निर्मात्या मर्सिडीज-बेंझ, बीएमडब्ल्यू आणि ऑडीनेही येत्या नवीन वर्षात जानेवारीपासून त्यांच्या कारच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.


टाटा मोटर्सच्या शेअर्सवरही परिणाम होणार 


उद्या आठवड्याचा शेवटचा व्यवहार दिवस आहे आणि त्याआधी टाटा मोटर्सने आपली व्यावसायिक वाहने महाग करण्याची घोषणा केल्याने त्यांच्या शेअर्समध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आजचा व्यवहार टाटा मोटर्सच्या शेअर्सच्या घसरणीसह बंद झाला आहे, टाटा मोटर्सचे शेअर्स 12.10 रुपये किंवा 1.51 टक्क्यांच्या घसरणीसह 787 रुपये प्रति शेअरवर बंद झाले आहेत. दरम्यान, टाटा मोटार्सने वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळं खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच झळ लागणार आहे. त्यामुळं नवीन वर्षात वाहनांची किती खरेदी होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. या किंमत वाढीचा वाहन खरेदीवर काय परिणाम होतो हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 


महत्वाच्या बातम्या:


टाटा मोटर्स देणार फास्‍ट-चार्जिंगच्या 250 स्‍टेशन्‍सची सुविधा, सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी