Tata Group Market News: आठवडाभरापासून शेअर बाजारात (Share market) मोठा गदारोळ आहे. यामध्ये काही कंपन्या मोठा नफा कमवत असल्याचं चित्र दिसत आहे.  हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि टीसीएसच्या भागधारकांनी मोठा नफा मिळवला आहे. टीसीएसने (TCS) 5 दिवसात 20000 कोटींची कमाई केली आहे. तर दुसरीकडे HDFC बँकेच्या गुंतवणूकदारांचे 60000 कोटी रुपयांचे नुकसान झालं आहे.


स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी मागील आठवडा वाईट ठरला आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) च्या 30 शेअर्सचा सेन्सेक्स 1213.68 अंकांनी किंवा 1.64 टक्क्यांनी घसरला. दरम्यान, सलग चार दिवस झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर सहा टॉप-10 कंपन्यांचे बाजारमूल्य एकत्रितपणे 1.73 लाख कोटी रुपयांनी घसरले, परंतु असे असतानाही टाटा समूहाची आयटी कंपनी टीसीएसच्या गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला.


सर्वात मौल्यवान असलेल्या कंपन्यांपैकी एचडीएफसी बँक, एलआयसी, रिलायन्स इंडस्ट्रीज या कंपन्यांच्या बाजार भांडवलात घट झालीय. दुसरीकडे, ढासळत चाललेल्या बाजारपेठेतही, हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आपल्या गुंतवणूकदारांना लाभ देण्यात आघाडीवर राहिली. तिचे मार्केट कॅप 33,270.22 कोटी रुपयांनी वाढले आणि 5,53,822.16 कोटी रुपयांवर पोहोचले. याशिवाय, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS मार्केट कॅप) चे मार्केट कॅप 14,09,552.63 कोटी रुपयांपर्यंत वाढले आणि कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 20,442.2 कोटी रुपयांची वाढ झालीय. या दोन्ही कंपन्यांना मोठा नफा मिळाला आहे. 


कोणकोणत्या कंपन्यानी मिळवला पैसा 


दूरसंचार क्षेत्रातील दिग्गज भारतीय एअरटेल आणि आयटी कंपनी इन्फोसिसची नावेही गेल्या आठवड्यात कमाई करणाऱ्या कंपन्यांच्या यादीत समाविष्ट करण्यात आली होती. एकीकडे, भारती एअरटेलचे बाजार भांडवल 14,653.98 कोटी रुपयांनी वाढले आणि ते 7,38,424.68 कोटी रुपयांच्या पातळीवर पोहोचले. दुसरीकडे, इन्फोसिसचे बाजार मूल्य 3,611.26 कोटी रुपयांनी वाढून 5,91,560.88 कोटी रुपये झाले. टीसीएसबरोबर या कंपन्या देखील चांगल्या नफ्या तआहेत. 


या दोन कंपन्यांना बसला मोठा फटका


HDFC आणि LIC या मोठ्या कंपन्यांना सर्वात मोठा फटका बसला आहे. खासगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या गुंतवणूकदारांना या काळात सर्वाधिक तोटा सहन करावा लागला. HDFC बँक MCap रु. 60,678.26 कोटींनी घसरून रु. 10,93,026.58 वर आला. याशिवाय, LIC चे मार्केट कॅप 43,168.1 कोटी रुपयांनी कमी झाले आणि ते 5,76,049.17 कोटी रुपये राहिले. गुंतवणूकदारांच्या नुकसानीच्या बाबतीत तिसरी सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज होती, ज्याचे बाजार मूल्य (रिलायन्स मार्केट कॅप) 36,094.96 कोटी रुपयांनी घसरून 19,04,643.44 कोटी रुपये झाले. या तिनही कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.  तसेच ICICI बँक MCap रु. 17,567.94 कोटींनी घसरून रु. 7,84,833.83 कोटी, SBI मार्केट कॅप रु. 11,780.49 कोटींनी घसरून रु. 7,30,345.62 कोटी झाले आहे.


महत्वाच्या बातम्या:


एसआयपी करताना फक्त 'ही' चार सूत्रं पाळा, मालामाल व्हा; मिळवा दुप्पट, चौपट परतावा!