Success Story : अलीकडच्या काळात अनेक शेतकरी (Farmers) आपल्या शेतात विविध प्रयोग करताना दिसत आहेत. या माध्यमातून भरघोस उत्पादन घेत आहेत. आज आपण बिहारमधील (Bihar) शेतकरी आशुतोष पांडेंची (Ashutosh Pandey) यशोगाथा पाहणार आहोत. आशुतोष पांडे हे विविध भाजीपाला अशा पद्धतीने पिकवतात की त्यांचे उत्पादन वर्षभर मिळते. त्यांनी बटाटे, सोयाबीन, शिमला मिरची, चवळी आणि धणे या पिकांच्या उत्पादनातून भरघोस नफा मिळवला आहे. एका हेक्टरमध्ये या शेतकऱ्याने 8 लाखांचा नफा मिळवला आहे. 


आजच्या काळात तरुण शेतकऱ्यांचे लक्ष शेतीकडे जात असल्याचे दिसत आहे. अनेत तरुण शेतीत आपलं नशीब आजमावत आहेत. एवढेच नाही तर त्यांना यशही मिळत आहे. किंबहुना अधिक उत्पन्नाच्या शोधात आजची तरुणाई काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासाठी शेती हा उत्तम पर्याय ठरत आहे. 


विविध पिकांची लागवड


आशुतोष पांडे हे विविध भाजीपाला अशा पद्धतीनं पिकवतात की त्यांचे उत्पादन वर्षभर मिळते. त्यांनी बटाटे, सोयाबीन, शिमला मिरची, चवळी आणि धणे यांचे उत्पादन ऑफ-सीझन मार्केटला टॅप करण्याच्या उद्देशाने केले. आशुतोषने स्ट्रॉबेरीची देखील लागवड केली आहे. मागील पिकाच्या तुलनेत यातून त्यांना चांगला नफा मिळत आहे.


स्ट्रॉबेरी पिकातून चांगले उत्पन्न


आशुतोषला स्ट्रॉबेरीचे देखील चांगल उत्पन्न मिळालं आहे. त्यांची स्ट्रॉबेरी 100 ते 200 रुपये दराने विकली जाते. त्यांनी बटाटे आणि सोयाबीनची लागवड रुंद वाफ्यात केली आहे. प्रत्येक बेडवर दोन ओळी बटाटे आणि बीन्स लावले आहेत. त्यांनी बटाट्याचे 140 क्विंटल उत्पादन घेतले आहे. तसेच त्यांनी आपल्या शेतात कोथिंबिरीचेही उत्पादन घेतलं आहे. 


भाजीपाल्याच्या उत्पादनांना हॉटेल्स आणि स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी


बटाटे, सोयाबीन, चवळी यासारख्या उच्च किमतीच्या पिकांच्या उत्पादनांना हॉटेल्स आणि स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी आहे. तसेच स्ट्रॉबेरीची लागवड अधिक फायदेशीर ठरत आहे. त्यामुळं ग्रामीण भागातील युवक मोठ्या प्रमाणात शेतीकडे वळत असल्याचं चित्र दिसत आहे. 


महत्वाच्या बातम्या: