Success Story : इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर सामान्य माणूस देखील शून्यातून मोठं विश्व निर्माण करु शकतो. मग क्षेत्र कोणतही असो. आज आपण अशाच एका झारखंडमधील (jharkhand) रोजंदारी (labor) करुन स्वत:चं एक वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या तरुणाची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. रोजंदारी करणाऱ्या एका तरुणाने माळरानावर सोनं उगवलं आहे. विविध शेतीच्या पिकातून हा तरुण लाखो रुपयांचं उत्पन्न मिळवत आहे.
जिद्द आणि कठोर परिश्रमाने या तरुणाने यशाला गवसणी घातली आहे. कृषी क्षेत्रात या तरुणाने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. गानसू महतो असं या तरुण शेतकऱ्याचं नाव आहे. रांचीपासून 30 किलोमीटर असणाऱ्या सदमा गावात महतो राहतात. काही दिवसापूर्वी या भागात ते फक्त 50 रुपयांवर मजुरीचे काम करत होते. अन्नधान्याची टंचाई होती. एक दिवस काम नाही केलं तर पोट भरण्याची पंचाईत होती. पण आज या शेतकऱ्यांने 15 एकर शेती मिळवली आहे. यातून ते लाखो रुपयांचे उत्पन्न काढतात. पिकांमध्ये वांगे, टोमॅटो, सिमला मिरची, टरबूज, खरबूज आणि कोळंबी, नेनुआ, भोपळा, कारले अशी पिकं घेतात. या पिकापासून वर्षभरात ते साधारण 50 लाख रुपयाहून अधिक रुपये मिळवतात.गानसू महतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते 50 रुपये मिळवण्यासाठी रांची शहरात जात होते. तिथे ते दिवसभर वीट गाळण्याचे काम करायचे. त्यानंतर त्यांना 50 रुपये मिळायचे.
गानसूने खडकाळ मातीत सोने उगवले
गानसू महतो यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या वडिलांकडे 9 एकर जमिन होती. पण माळरान होते. मोठ मोठे दगड गोठे होते. शेतातून फारच कमी उत्पन्न मिळत होते. घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळं महतो यांनी अर्ध्यातूनच शिक्षण सोडले आणि रोजदांरीचे काम सुरु केले. तीन वर्ष रोजंदारी केल्यानंतर मेहतो यांनी आपल्या घरच्या जमिनीत कष्ट करायला सुरुवात केली. शेणखत टाकूण हळूहळू जमिन सुपीक केली. त्यानंतर धानाची लागवड केली, गानसू यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. पण ते फक्त भातशेतीवरच अवलंबून न राहता भाजीपाला पिकाची लागवड देखील त्यांनी सुरु केली. सुरुवातीला त्यांनी शिमचा मिरचीची लागवड केली. त्यामध्ये त्यांना चांगला फायदा झाला. त्यानंतर हळूहळू त्यांनी इतर भाजीपाला पिकांची लागड सुरु करुन चांगला नफा मिळवला.
पॉलीहाऊसमध्ये जरबेराची लागवड
काही काळानंतर गानसू यांनी पॉलीहाऊसमध्ये जरबेराच्या लागवड केली. यातून त्यांना 35 लाख रुपयांचे आणि भाजीपाला लागवडीतून 15 लाख रुपयांचे उत्पादन मिळाले. उत्पादन खर्चात कपात करून सुमारे 30 लाखांची बचत झाली. आज झारखंडमध्ये त्यांची शेतीची जोरदार चर्चा सुरु आहे. आत्तापर्यंत त्यांनी 35,000 शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं आहे. यामध्ये भारतीय लष्कर, साईनाथ विद्यापीठ, राय विद्यापीठ, रामकृष्ण मिशन, बीएस्सी कृषी शाखेतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या: