Success Story : अलीकडच्या काळात अनेक तरुण-तरुणी नवनवीन व्यवसायात उतरताना दिसत आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा (modern technology)वापर करुन व्यवसायातून चांगला नफा मिळवत आहेत. यातीलच एक व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय (Dairy Business). आज आपण अशाच एका दुग्ध व्यवसायात यशस्वी झालेल्या महिलेची यशोगाथा (success story) पाहणार आहोत. या महिलेनं फक्त 5 गायींपासून (cow) सुरु केलेल्या व्यवसाय आज 46 गायींवर गेला आहे. या माध्यमातून ती दरमहा लाखो रुपयांचा नफा मिळवत आहे. पाहुयात या महिलेची यशोगाथा
दररोज 650 लिटर दूध डेअरीला
कष्ट करण्याची तयारी आणि उत्तम नियोजन केलं तर दुग्ध व्यवसाय देखील चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय आहे. कमी खर्चात मोठा नफा या व्यवसायातून मिळतो. कर्नाटकमधील (Karnataka) तुमकुरु जिल्ह्यातील कोरटागेरे तालुक्यातील राजेश्वरी (rajeshwari) या महिलेनं दुग्ध व्यवसायातून स्वत:ची प्रगती साधलीय. राजेश्वरी यांनी 5 गायींपासून व्यवसायाची सुरुवात केली होती. आज त्यांच्याकडे 46 गायी असून दररोज 650 लिटर दूध डेअरीला जाते. यातून राजेश्वरी दरमहा 7 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत. त्यांच्या या दुग्ध व्यवसायाला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत.
कमी खर्चात मोठा नफा
राजेश्वरी यांनी सुरु केलेल्या दुग्ध व्यवसायाचा सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. राजेश्वरी यांनी 2019 साली दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली होती. सुरुवातीला राजेश्वरी यांच्याकडे फक्त पाच गायी होत्या. मात्र, त्यानंतरच्या काळात त्यांनी हळूहळू गायींचा व्याप वाढवला. आज त्यांच्याकडे 46 गायी आहेत. त्या दररोज कर्नाटक मिल्क फेडरेशनला 650 लिटर दूध घालतात. या माध्यमातून त्या मोठा आर्थिक नफा मिळवत आहेत. अनेक महिला शेतकऱ्यांना राजेश्वरी यांचा आदर्श घेऊन दुग्ध व्यवसाय सुरु केला आहे. अनेक महिलांना राजेश्वरी मार्गदर्शन देखील करत आहेत.
दुग्ध व्यवसाय करताना काय काळजी घ्यावी
दरम्यान, दुग्ध व्यवसाय करताना आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. गायींचं योग्य नियोजन केलं तरच या व्यवसायात यशस्वी होता येतं. यासाठी प्रथम गायीचं आरोग्य चांगल ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये चारा ते पशुवैद्यकीय उपचार करणे महत्वाचे आहे. गायीला वेळच्या वेळी चारा पाणी करणं आवश्यक असते. तसेच गोठ्याची स्वच्छता राखणं महत्वाचं आहे. तसेच वेळोवेळी गायीला स्वच्छ पाण्यानं धुणे देखील गरजेचे असते. हिरवा चारा योग्य प्रमाणात देणं देखील गरजेचं असल्याचं राजेश्वरी यांनी सांगितलं. गायींना योग्य प्रकारचा चारा मिळावा म्हणून राजेश्वरी यांना भाडेतत्वावर जमिन घेतली आहे. या जमिनीतून जनावरांना चाराही होतो आणि बाकीचे उत्पन्नही घेता येत असल्याची माहिती राजेश्वरी यांनी दिली. राजेश्वरी यांच्याकडे जर्सी आणि होल्स्टीन फ्रिजियन जातीच्या गायी आहेत. या गायी उच्च दुधासाठी ओळखल्या जातात.
दरम्यान, उन्हाळ्यात गायींच्या चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. कारण पाण्याची मोठी कमतरता भासते. यामुळं उन्हाळ्याच आसपासच्या जिल्ह्यातून चाऱ्याची खरेदी करावी लागत असल्याची माहिती राजेश्वरी यांनी दिली. राजेश्वरी यांच्या यशस्वी दुग्ध व्यवसायाचे सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
महत्वाच्या बातम्या: