Share Market Opening Bell : शेअर बाजारात (Share Market) सोमवारच्या घसरणीनंतर आज चांगली सुरुवात झाला आहे. इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातीव युद्धाचा परिणाम सोमवारी जागतिक बाजारासह भारतीय बाजारातही दिसून आला होता. पण, आज सेन्सेक्स आणि निफ्टीच्या उसळी सह सुरुवातीच्या सत्राला सुरुवात झाली. मंगळवारी बाजार उघडताच सोमवारी फटका बसलेल्या सेक्टरमध्येही तेजी पाहायला मिळत आहे. तेलाच्या किमती सतत वाढ होताना दिसत आहे. 


आज सेन्सेक्स आणि निफ्टीची उसळी


आज सुरुवातीच्या सत्रात निफ्टी 19,550 च्या वर उघडला आहे, तर सेन्सेक्स जवळपास 150 अंकांनी वर आहे. निफ्टी बँक देखील 44,000 च्या वर उघडली आहे. सोमवारी जवळपास 3 टक्के घसरला असून PSU बँक निर्देशांक 0.6 टक्के वाढीसह उघडला आहे. इतर सर्व सेक्टरमध्येही घोडदौड पाहायली मिळत आहे. टायटन आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली आहेत. 


 


बेंचमार्क इक्विटी निर्देशांक सोमवारी सकारात्मक उघडले. NSE निफ्टी 0.27 अंकांनी उसळून 19565.6 वर उघडला, तर BSE सेन्सेक्स 149.88 अंकांनी उसळून 65,512.39 वर उघडला. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत. बँक निफ्टी निर्देशांक 141.05 अंकांनी वाढून 44,027.55 वर उघडला. मंगळवारी इतर क्षेत्रीय निर्देशांकही सकारात्मक वाढीसह उघडले.