Stock Market Holidays 2025 मुंबई: भारतीय शेअर बाजाराला 2025 मध्ये किती दिवस सुट्टी असणार हे बीएसई आणि एनएसईनं जारी केलं आहे. 2025 या वर्षात शेअर बाजार शनिवार आणि रविवार वगळून सुट्टीनिमित्त 14 दिवस बंद राहील. रिटेल गुंतवणूकदार, ब्रोकरेज हाऊस, विदेशी गुंतवणूकदार, देशांतर्गत गुंतवणूकदार यांच्यासाठी बीएसई आणि एनएसईनं सुट्टीचं वेळापत्रक फायदेशीर ठरणार आहे. 2025 मध्ये शेअर मार्केट महाशिवरात्रीच्या दिवशी बंद असेल. शनिवार आणि रविवार वगळता ही पहिली सुट्टी असेल. महाशिवरात्रीनिमित्त शेअर बाजार 26 फेब्रुवारीला बंद राहील.  

शेअर बाजाराला किती दिवस सुट्टी ?

बीएसई आणि एनएसईनं  2025 मध्ये शेअर मार्केट कोणत्या दिवशी बंद असेल आणि कोणत्या दिवशी ट्रेडिंग हॉलिडे असेल याबाबत माहिती दिली आहे. या सुट्ट्या इक्विटी सेगमेंट, इक्विटी डेरिवेटीव सेगमेंट आणि एसएलबी सेगमेंटला देखील लागू असतील.  2025 मध्ये शेअर मार्केटला शनिवार आणि रविवार वगळता 14 दिवस सुट्टी राहील. पहिली सुट्टी  26 फेब्रुवारीला महाशिवरात्री निमित्त, 14 मार्चला होळी आणि 31 मार्चला ईदच्या निमित्तानं बंद असेल.  

2025 मध्ये शेअर बाजार कोणत्या दिवशी बंद असणार?

26 एप्रिल : महाशिवरात्री14 मार्च : होळी31 मार्च : रमजान ईद10 एप्रिल : महावीर जयंती14 एप्रिल : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती 18 एप्रिल : गुड फ्रायडे 1 मे : महाराष्ट्र दिन15 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिन27 ऑगस्ट : गणेश चतुर्थी 2 ऑक्टोबर :महात्मा गांधी जयंती / दसरा21 ऑक्टोबर : दिवाळी लक्ष्मीपूजन22 ऑक्टोबर :दिवाळी बळीप्रतिपदा5 नोव्हेंबर : प्रकाश गुरपर्व25 डिसेंबर :ख्रिसमस 

21 ऑक्टोबरला मुहूर्त ट्रेडिंग 

वर्षभरात शेअर मार्केटला 14 दिवस सुट्टी असेल. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी शेअर बाजारात ट्रेडिंग होतं, त्याला मुहूर्त ट्रेडिंग म्हटलं जातं. 2025 मध्ये मुहूर्त ट्रेडिंग 21 ऑक्टोबरला होणार आहे.  त्यानंतरचा दिवस 22 ऑक्टोबरला देखील सुट्टी राहील. 

1 फेब्रुवारीला मार्केट सुरु राहणार

नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं अर्थसंकल्प सादर करण्याच्या तारखांमध्ये बदल करत 1 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली आहे. त्यानुसार 2025-26 या आर्थिक वर्षात देखील अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर होणार आहे. त्यामुळं या दिवशी शनिवार असून देखील स्पेशल ट्रेडिंगचं आयोजन करण्यात आलं आहे. अर्थसंकल्प सादर होणार असल्यानं विशेष ट्रेडिंग सत्र आयोजित केलं जाणार आहे.  

इतर बातम्या : 

GOLD Rate Today : अखेर सोन्याच्या दरात तेजी,चांदीच्या दरात वाढ, MCX वर नेमकं काय घडतंय?