मुंबई : बघता बघता या वर्षातील पाच महिने संपले आहेत. आजपासून जून महिना चालू झाला आहे. या महिन्याच्या पहिल्याच दिवशी नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण आज (1 जून) व्यावसायिक गॅस सिलिंडरचा दर कमी करण्यात आला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात सध्यातरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या महिन्यात पहिल्याच दिवसापासून अनेक नियम बदलणार आहेत. हे नियम माहीत नसल्यास तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
जून महिन्यात वाहतुकीचे नियम बदलणार
जून महिन्यापासून वाहतुकीच्या नियमांत बदल करण्यात आले आहेत. हे नियम 1 जूनपासून लागू होतील. येथून पुढे आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही. तुम्हाला एखाद्या खासगी ड्रायव्हिंग स्कूलमध्येही लायसन्स मिळणार आहे. नियमांत बसणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल्सना ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. यासह वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड भरावा लागणार आहे. वेगाची मर्यादा ओलांडत वाहन चालवल्यास 1 ते 2 हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.
अल्पवयीन मुलाने गाडी चालवल्यास 25 हजारांचा दंड
तसेच अल्पयवीन मुलगा-मुलगी वाहन चालवताना दिसल्यास त्याच्या पालकांकडून 25,000 रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. यासह अशा प्रकरणांत वाहन मालकाची नोंदणी रद्द केली जाईल. तसेच गाडी चालवणाऱ्या अल्पवयीन व्यकीला 25 वर्षांपर्यंत वाहन चालवण्याचा परवाना दिला जाणार नाही.
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढली
आधारकार्ड मोफत अपडेट करण्याची मुदत वाढवण्यात आली आहे. ही मुदत 14 जूनपर्यंत असेल. पण ई-सेवा केंद्रावर जाऊन तुम्ही आधार कार्ड अपडेट करण्याचा पर्याय निवडल्यास तुम्हाला प्रत्येक अपडेटसाठी 50 रुपये फी द्यावी लागेल.
गॅस सिलिंडर स्वस्त, नवा दर लागू
एक जूनपासून एलपीजी सिलिंडर स्वस्त झाला आहे. हा नवा दर आजपासूनच लागू झाला असून व्यावसायिक गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
हेही वाचा :
Bank Holiday : जून महिन्यात तब्बल 'इतके' दिवस बँका बंद; जाणून घ्या नेमकी तारीख!
Gas Cylinder Rate : जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना खुशखबर; गॅस सिलिंडर स्वस्त!
जून महिन्यात शेअर बाजार सलग तीन दिवस बंद, शेअर्स खरेदी-विक्री करता येणार नाहीत; कारण काय?