Share Market Opening : गुरुवारी झालेल्या पडझडीनंतर शुक्रवारी शेअर बाजार चांगलाच वधारला. शेअर बाजारातील व्यवहार सुरू होण्यापूर्वी प्री-ओपनिंगमधून शेअर बाजारातून चांगले संकेत मिळाले होते. त्यानंतर शेअर बाजार वधारणार असल्याची अटकळ बांधण्यात आली. सेन्सेक्सने सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास 60 हजाराचा टप्पा ओलांडला. निफ्टीनेदेखील 17800 चा टप्पा ओलांडला. 


शेअर बाजाराची सुरुवात


शेअर बाजाराच्या सुरुवातीला निफ्टी 17, 797 वर होता. बाजार सुरू होताच निफ्टीने 17, 800 चा टप्पा ओलांडला. बाजार सुरू होण्याच्या काही क्षणात सेन्सेक्सनेदेखील 275 अंकांची उसळण घेतली. त्यानंतर सेन्सेक्सने 60 हजाराचा टप्पा ओलांडला. 


सुरुवातीच्या 15 मिनिटात कसा झाला ट्रे़ड


बाजार सुरू होण्याच्या 15 मिनिटाच्या हातच सेन्सेक्स 60 हजार अंकाजवळ आला होता. निफ्टीतही 106.3 अंकांनी वधारला असल्याचे दिसून आले. 





प्री-ओपनिंगमध्ये व्यवहार


आज प्री-ओपिनिंग व्यवहारात सेन्सेक्समध्ये 174 अंकाची तेजी दिसून आली. निफ्टीमध्ये 55 अंकानी वधारला. 


आशियाई बाजारातील परिस्थिती


आशियाई बाजारामध्ये सध्या संमिश्र प्रतिसाद दिसून आला. निक्केई आणि कोस्पी यांना वगळता इतर सूचकांक वधारले होते. निक्केईमध्ये जवळपास 200 अंकांची घसरण दिसून आली. 


दरम्यान, गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स 621 अंकांनी घसरला होता. तर निफ्टी 179 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये एकूण 1.03 टक्क्यांची घसरण होऊन तो पुन्हा एकदा 60 हजारांखाली आला होता. बाजार बंद होताना सेन्सेक्स 59,601.84 अंकावर पोहोचला. निफ्टीमध्येही 179 अंकांची घसरण होऊन तो 17,745.90 वर पोहोचला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: 


Cryptocurrency Fraud :  भारतामध्ये 1200 कोटींचा क्रिप्टो घोटाळा, 900 लोकांची फसवणूक


Apple चं भांडवल भारतासारख्या 194 देशांच्या GDP पेक्षा अधिक, तीन ट्रिलियन डॉलर बाजारमूल्य असणारी जगातील पहिली कंपनी


 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha