Apple : अ‍ॅपल कंपनीचे मार्केट तीन ट्रिलियन डॉलरच्या पुढे गेलेय. हे मार्केट कॅप भारत आणि ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेपेक्षा खूप जास्त आहे. अॅपलच्या मार्केट कॅपने इतिहासात प्रथमच तीन ट्रिलियन डॉलर म्हणजेच 3 लाख कोटी डॉलर म्हणजेच सुमारे 224 लाख कोटीचा आकडा पार केला आहे. भारताची अर्थव्यवस्था 2.65 ट्रिलियन डॉलर आहे. 


अॅपलचे आयफोन आणि आय वॉचने जगभरातील लोकांना भुरळ घातली आहे.  अॅपलच्या व्यवसायात चांगलीच वाढ झाली आहे.  त्यामुळेच अॅपलने चक्क तीन ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला. जगात अॅपल या कंपनीच्या पुढे फक्त चार देश आहेत ज्यांची अर्थव्यवस्था इतकी मोठी आहे.


जगातील मोठी अर्थव्यवस्था असलेले देश


अमेरिका-  204.9 ट्रिलियन डॉलर
चीन- 13.4 ट्रिलियन डॉलर
जपान- 4.97 ट्रिलियन डॉलर
जर्मनी- 4 ट्रिलियन डॉलर
ब्रिटन-  2.83 ट्रिलियन डॉलर
फ्रान्स- 2.78 ट्रिलियन डॉलर
भारत- 2.65  ट्रिलियन डॉलर



दोन ट्रिलियन डॉलर ते तीन ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठण्यासाठी अ‍ॅपलला फक्त 16 महिने लागले. मात्र एक  ट्रिलियनचा टप्पा गाठण्यासाठी अॅपलला 42 वर्षे लागली होती. 


अॅपलच्या व्यवसायाचा प्रवास


ऑगस्ट 2018- 1 ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला
ऑगस्ट 2020- 2 ट्रिलियन डॉलर
जानेवारी 2021- 3 ट्रिलियन डॉलर


स्टीव जॉब्स आणि स्टीव वोजनियाक या दोन तरुणांनी 1976  मध्ये एका गॅरेजमध्ये अॅपलची स्थापना केली होती.1 एप्रिल 1976 ला मॉनिटर नसलेला पहिला अॅपल 1 लॉन्च करण्यात आला होता. 1978 मध्ये अॅपल-2 लॉन्च केला आणि कंपनीची भरभराट सुरु झाली. जानेवारी 2007 मध्ये स्टीव्ह जॉब्सने पहिला आयफोन लॉन्च केला आणि मोबाईल जगात एक क्रांती आणली. आज जगात आयफोन आणि आयवॉचची विक्री प्रचंड वाढलीय. आता तर अॅपल भारतातच आयफोनची निर्मिती करणार आहे. याचा भारताला नक्कीच फायदा होईल यात शंका नाही.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :