Stock Market Opening: आज शेअर बाजाराची (Share Market) सुरुवात संमिश्र होती, पण बाजार उघडताच सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीत (Nifty) तेजी पाहायला मिळाली. सुरुवातीच्या काही मिनिटांतच सेन्सेक्सनं 57800 चा टप्पा ओलांडला. याशिवाय निफ्टीनंही बाजार उघडताच 17000 च्या वरची पातळी गाठली. आज, जवळपास सर्व सेक्टोरल इंडेक्समध्ये तेजी दिसून येत आहे, ज्यामुळे बाजार तेजीत असल्याचं पाहायला मिळत आहे. आशियाई बाजारातही (Asian Market) तेजी पाहायला मिळत आहे. 


सुरुवात संमिश्र, पण नंतर तेजी 


BSE चा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 41.64 अंकांच्या घसरणीसह 57,572.08 च्या पातळीवर उघडला. दुसरीकडे, निफ्टीबद्दल बोलायचं झाल्यास, NSE चा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 25.60 अंक म्हणजेच, 0.15 टक्क्यांच्या वाढीसह 16,977.30 वर उघडला. 


सेन्सेक्स आणि निफ्टी शेअर्सची परिस्थिती काय? 


आजच्या व्यवहारात सेन्सेक्समधील 30 पैकी 24 शेअर्स तेजीसह व्यवहार करत आहेत. NSE निफ्टीच्या 50 पैकी 39 शेअर्समध्ये तेजी दिसत आहे. याशिवाय 10 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. 1 स्टॉक कोणत्याही व्यवहाराशिवाय ट्रेड करत आहे.


सेक्टोरल इंडेक्स 


आजच्या व्यवसायात, सर्व क्षेत्रीय इंडेक्स NSE च्या निफ्टीमध्ये वाढ दाखवत आहेत. ऑईल अँड गॅसच्या शेअर्समध्ये आज काहीशी घट दिसते. बँक, मेटल, ऑटो, फार्मा, मीडिया, हेल्थकेअर, कंझ्युमर ड्युरेबल्स, आयटी शेअर्समध्ये तेजी आहे. आज ऑटो आणि एफएमसीजी सोबतच रियलटी आणि पीएसयू बँक शेअर्स चांगल्या तेजीसह व्यवहार करत आहेत.


सेन्सेक्सचे कोणते शेअर तेजीत?


M&M, HUL, Tata Motors, HCL Tech, Bajaj Finserv, HDFC Bank, UltraTech Cement, Bharti Airtel, HDFC, बजाज फायनान्स, टेक महिंद्रा, सन फार्मा, नेस्ले, L&T, ITC, एनटीपीसी, पॉवरग्रिड, मारुती सुझुकी, कोटक महिंद्रा बँक, एशियन पेंट्स, टायटन, विप्रो, एसबीआय, आयसीआयसीआय बँक हे सेन्सेक्सचे टॉप 24 शेअर्स आहेत, जे सध्या तेजीत व्यवहार करत आहेत.  


मंगळवारी शेअर मार्केटमध्ये पडझड 


भारतीय शेअर बाजारात मंगळवारी विक्रीचा दबाव दिसून आला आहे. गुंतवणूकदारांनी केलेल्या नफावसुलीमुळे बाजारात घसरण दिसली. सेन्सेक्स-निफ्टी निर्देशांकात किंचीत घसरण झाली होती. तर, दुसरीकडे संपूर्ण बाजारात पडझड दिसून आली होती. स्मॉल कॅप आणि मिड कॅप शेअर्समध्ये विक्रीचा सपाटा दिसून आला होता. काल बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 40 अंकांच्या घसरणीसह 57,613 अंकांवर स्थिरावला होता. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 34 अंकांच्या घसरणीसह 16,951 अंकांवर स्थिरावला होता. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


EPFO : पीएफच्या 6 कोटी खातेदारांसाठी गुड न्यूज; EPFO कडून व्याज दरात वाढ