Stock Market Opening: भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) आज (15 मार्च) घसरणीतून काहीसा सावरल्याचं पाहायला मिळालं आणि सुरुवातीच्या व्यवहारातच सेन्सेक्सने (Sensex) 500 हून अधिक अंकांची उसळी घेतली आहे. सेन्सेक्सने 58400 चा टप्पा पार केला आहे. निफ्टी (Nifty) देखील 17200 च्या जवळ व्यवहार करताना दिसत आहे. बँक निफ्टी (Bank Nifty) सुमारे 450 अंकांसह व्यवहार करत आहे आणि 1.12 टक्क्यांवर आहे.


आज सकाळी शेअर बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीला, NSE चा निफ्टी 17,166.45 वर उघडला आणि BSE चा सेन्सेक्स 58,268.54 वर उघडला.


सकाळच्या सत्रात बाजारातील परिस्थिती 


सकाळी 9.20 वाजता बीएसई सेन्सेक्स 508.88 अंकांच्या म्हणजेच, 0.88 टक्क्यांच्या वाढीसह 58,409.07 वर व्यवहार करत होता. तर NSE चा निफ्टी 151.10 अंकांच्या म्हणजेच, 0.89 टक्क्यांच्या वाढीसह 17,194.40 वर व्यवहार करत होता.


सेन्सेक्सच्या शेअर्सची स्थिती काय? 


सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर्स तेजीत व्यवहार करत आहेत आणि त्यात एशियन पेंट्स, टायटन, मारुती, एल अँड टी, टाटा स्टील, कोटक महिंद्रा बँक आणि इंडसइंड बँक, पॉवरग्रीड, बजाज फिनसर्व्ह, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, अल्ट्राटेक सिमेंट, अॅक्सिस बँक, एचडीएफसी, टाटा मोटर्स, विप्रो, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, आयटीसी, एसबीआय, टेक महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचसीएल टेक, सन फार्मा, इन्फोसिस, नेस्ले हे शेअर्स वधारले आहेत.


निफ्टीच्या शेअर्सची स्थिती काय? 


आज, 50 पैकी 46 शेअर्स निफ्टी शेअर्सच्या वाढीसह आणि फक्त 4 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत. आज वाढणाऱ्या प्रमुख शेअर्सपैकी अदानी एंटरप्रायझेस, टायटन, मारुती, एशियन पेंट्स आणि अदानी पोर्ट्सचे शेअर्स वेगानं व्यवहार करत आहेत.


बँक निफ्टीत तेजी 


आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात बँक निफ्टीमध्ये 442 अंकांची वाढ दिसून येत असून तो 1.12 टक्क्यांच्या वाढीसह 39853 च्या पातळीवर व्यवहार करताना दिसत आहे.


मंगळवारी बाजाराची स्थिती काय होती? 


भारतीय शेअर बाजारासाठी कालचा दिवसही निराशाजनक होता. मंगळवारी (14 मार्च) सकाळी शेअर बाजारातील व्यवहार सुरु झाल्यानंतर आजही खरेदीचा जोर दिसल्याने निर्देशांक वधारला होता. त्यानंतर नफावसुली सुरु झाल्याने बाजारात घसरण दिसून आली. काल, दिवसभरातील व्यवहार थांबला तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 58 हजार अंकांखाली आला. सेन्सेक्स 337 अंकांच्या घसरणीसह 57,900 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 111 अंकांच्या घसरणीसह 17,043 अंकांवर स्थिरावल्याचं पाहायला मिळालं होतं. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Write-Off Loan Recovery: चार वर्षात 8.48 लाख कोटींचे कर्ज राइट ऑफ; पाच वर्षात 2.3 लाख कोटींच्या कर्जाची वसुली