Stock Market Opening: आज भारतीय शेअर बाजाराची (Indian Stock Market) सुरुवात थोड्या तेजीनं झाली आहे. जागतिक संकेतांचा विशेष पाठिंबा मिळाला नाही, पण देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या जोरावर आज शेअर बाजाराची सुरुवात तेजीत झाली आहे. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टी  (Nifty) दोन्ही वरच्या श्रेणीत व्यवहार करत आहेत. त्यानंतर मात्र शेअर बाजारात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. 

कसा होती बाजाराची सुरुवात? 

आजच्या व्यवहारात बीएसईचा 30 शेअर्सचा इंडेक्स सेन्सेक्स 57.83 अंकांच्या वाढीसह 60,805.14 वर उघडला. याशिवाय, एनएसईचा 50 शेअर्सचा इंडेक्स 20.10 अंक म्हणजेच, 0.11 टक्क्यांच्या वाढीसह 18,121.30 वर उघडला. 

सकाळी 9.23 मिनिटांनी काय होती बाजाराची परिस्थिती? 

शेअर बाजारात सकाळी 9.23 वाजता बाजार काहीसा संथावला. सेन्सेक्स 223.36 अंकांच्या म्हणजेच 0.37 टक्क्यांच्या घसरणीसह 60,523.95 वर व्यवहार करत होता. निफ्टी 55.15 अंकांच्या म्हणजेच 0.3 टक्क्यांच्या घसरणीसह 18,046.05 वर व्यवहार करत होता.

सेन्सेक्स आणि निफ्टीची स्थिती

सकाळी 9.25 वाजता सेन्सेक्सच्या 30 पैकी 12 शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आणि 18 शेअर्समध्ये घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. या व्यतिरिक्त निफ्टीच्या 50 पैकी 19 शेअर्समध्ये वाढ होत आहे आणि 31 शेअर्स कमजोरीसह गडगडल्याचं पाहायला मिळालं. 

सेक्टोरियल इंडेक्स 

जर आपण आजच्या सेक्टोरियल इंडेक्सवर नजर टाकली तर बाजार काहीसा संथ पाहायला मिळत आहे. तेजीत असलेल्या सेक्टर्समध्ये ऑटो, मीडिया, मेटल, फार्मा, रियल्टी, ऑईल अँड गॅस आणि हेल्थकेअर इंडेक्स या शेअर्समध्ये वाढ दिसून येत आहे. त्याचबरोबर आयटी, एफएमसीजी, बँक, कंझ्युमर ड्युरेबल्स आणि फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 

कोणते शेअर्स तेजीत? 

टाटा मोटर्स, टाटा स्टील, एम अँड एम, पॉवरग्रीड, सन फार्मा, टायटन, एचयूएल, एल अँड टी आणि कोटक महिंद्रा बँकेच्या शेअर्समध्ये आज तेजी पाहायला मिळत आहे. याशिवाय अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, एनटीपीसी, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, विप्रो, रिलायन्स, एचसीएल टेक, एशियन पेंट्स आणि आयसीआयसीआय बँक या शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. 

कोणते शेअर्स गडगडले? 