Stock Market News : पश्चिम आशियातील भूराजकीय तणावाचा भारतीय भांडवली बाजारावर (Stock Market) परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज सेन्सेक्स (Sensex) 1 हजार 264 अंकांनी कोसळला तर निफ्टीत (nifty) 344 अंकांची घसरण झाली आहे.  तर दुसरीकडे डॉलरच्या तुलनेत रुपया 8 पैशांनी कमकुवत झाला आहे. रुपया डॉलरच्या तुलनेत 83.90 वर उघडला आहे. कच्च्या तेलाच्या किंमती 75 डॉलर प्रति बॅरलवर गेल्या आहेत. 


BSE सेन्सेक्स 1264.20 अंकांनी घसरून 83,002.09 वर उघडला. दोन कारणांमुळे बाजारात मोठी घसरण होत आहे. F&O बाबत SEBI ची नवीन चौकट हे त्याचे एक कारण आहे आणि एक दिवसाच्या सुट्टीनंतर इस्रायल-इराण युद्धाच्या तणावाचा परिणाम दिसून येत आहे. बाजार जोरदार घसरणीसह उघडला असला तरी F&O फ्रेमवर्क हे यामागे मोठे कारण असल्याचे दिसते. NSE चा निफ्टी 344.05 अंकांनी किंवा 1.33 टक्क्यांनी घसरून 25,452.85 वर उघडला आणि त्याचे शेअर्स सतत घसरत असल्याचे दिसते. एनएसई निफ्टीसोबतच बँक निफ्टीही मोठ्या घसरणीवर उघडला आहे आणि सुरुवातीच्या काही मिनिटांत 550-600 अंकांपर्यंत घसरण दिसून आली आहे.


महत्वाच्या बातम्या:


अनिल अंबानी यांची 'ही' कंपनी सुस्साट, दोन आठवड्यांपासून देतेय जबरदस्त रिटर्न्स, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस!