Worli Hit And Run Case: वरळी 'हिट अॅड रन' (Worli Hit And Run Case) प्रकरणी पोलिसांकडून आरोपींच्या विरोधात आरोपपत्र आज दाखल केले जाण्याची शक्यता आहे. वरळी 'हिट अॅड रन' प्रकरणात कावेरी नाखवा यांचा अपघात मृत्यू झाला होता. या अपघाताचा एक प्रत्यक्षदर्शी टॅक्सीचालक पोलिसांनी शोधला. महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर मुख्यसाक्षीदार टॅक्सीचालकाची साक्ष नोंदवण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत 38 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.


716 पानांच्या आरोपपत्रात मुख्यआरोपी मिहीर शाह (Mihir Shah) याने मद्यपान केल्याचे परिस्थिती जन्य पुरावे पोलिसांच्या हाती, वैद्यकिय अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. परिस्थितीजन्य पुराव्यानुसार अपघाताच्या वेळी मिहीर शाहने मद्यपान केल्याची बाब स्पष्ट झाल्यामुळे पोलिसांनी या गुन्ह्यात मोटर वाहन कायदा कलम 185 ची वाढ करण्यात आली. अपघातग्रस्त मोटरगाडीच्या नोंदणीसह आरोपी मिहीर शाह, राजऋषी बिडावत या दोघांचेही चालक परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या प्रकरणात राजेश शाह यांना जामीन मिळाला असून राजऋषी बिडावत व मिहीर शाह अद्याप न्यायालयीन कोठडीत आहेत.


बिअर बारमध्ये मिहीरला 500 मिलीचे चार टीन दिले-


बिअर बारमध्ये मिहीरला 500 मिलीचे चार टीन दिल्याचे वेटरने पोलिसांच्या जबाबात सांगितले. या शिवाय अपघातग्रस्त बीएमडब्ल्यू मोटरगाडीचा नोंदणी क्रमांकही रद्द करण्यात आला आहे. तसेच या मोटरगाडीची विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास तात्काळ माहिती देण्याबाबतचे पत्रव्यवहार संबंधीत विभागांना करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.


नेमकं प्रकरण काय?


7 जुलै रोजी पहाटे साडेपाच वाजता अंधाऱ्या रस्तावरून प्रदीप नाखवा आणि कावेरी नाखवा मासे घेऊन स्कूटरवरून चालले होते. यावेळी मागून अलिशान बीएमडब्ल्यू कारने त्यांना अशी धडक दिली की, प्रदीप नाखवा बोनेटवर कोसळले आणि कावेरी नाखवा चाकाखाली गेल्या. प्रदीप नाखवा यांनी विनवणी करूनही मिहीर शाह थांबला नाही. त्याने कावेरी नाखवा यांना चाकाखाली आलेल्या कावेरी यांनी फरफटत नेलं.  मृत कावेरी या अपघातात कारच्या बंपर आणि चाकामध्ये अडकल्या होत्या. सुमारे दोन किलोमीटर कावेरी यांना तसेच फरफटत आणल्यानंतर वरळी सीफेसला मिहीर शहा आणि शेजारी बसलेला राजऋषी बिडावत यांनी चाकात अडकलेल्या कावेरी यांना बाहेर काढले आणि तसेच रस्त्यावर टाकले. त्यानंतर आरोपींनी मोटरगाडी बाजूने न नेता कावेरी यांच्या अंगावरून नेली आणि तिथून पळ काढला होता.


संबंधित बातमी:


Worli Accident : ओळख लपवण्यासाठी मिहीरने केस कापले आणि दाढी केली, 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी