Share Market Updates :  भारतीय शेअर बाजारासाठी आजचा दिवसही काहीसा निराशाजनक राहिला. आज सकाळी बाजारातील व्यवहाराची सुरुवात तेजीसह झाली. मात्र, नफावसुलीचा जोर वाढल्याने बाजारात घसरण दिसून आली. आज बाजारातील व्यवहार थांबले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 18.82 अंकांच्या घसरणीसह 60,672.72 अंकांवर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 17.90 अंकांच्या घसरणीसह 17,826.70 अंकांवर स्थिरावला. 

आज बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांपैकी 1432 कंपन्यांचे शेअर दर वधारले होते. तर,  1939 कंपन्यांचे शेअर दर घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 6 पैशांनी कमकुवत झाला. रुपया  82.79 वर बंद झाला. 

आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, आयटी, मेटल्स, रिअल इस्टेट, मीडिया, हेल्थकेअर, ऑईल अॅण्ड गॅस सेक्टरमधील शेअर दर घसरले. तर एफएमसीजी, एनर्जी, इन्फ्रा या सेक्टरच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मिड कॅप आणि स्मॉल कॅप समभागांमध्येही नफावसुली दिसून आली. निफ्टी आयटी 0.88 टक्के किंवा 275 अंकांनी घसरून 30,947 वर बंद झाला. बीएसई सेन्सेक्समधील 30 समभागांपैकी 13 शेअर्स तेजीसह बंद झाले तर 17 शेअर्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी 50 मधील 20  कंपन्यांचे शेअर दर तेजीत स्थिरावले. तर, 30 कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली.

BSE Sensex 60,708.09 60,976.59 60,583.72 0.03%
BSE SmallCap 27,918.39 28,066.32 27,895.94 -0.30%
India VIX 14.01 14.30 13.38 4.67%
NIFTY Midcap 100 30,556.80 30,788.25 30,519.05 -0.36%
NIFTY Smallcap 100 9,351.45 9,413.00 9,338.80 -0.36%
NIfty smallcap 50 4,226.65 4,261.70 4,220.85 -0.34%
Nifty 100 17,604.40 17,699.25 17,579.10 -0.13%
Nifty 200 9,218.95 9,269.70 9,206.05 -0.16%
Nifty 50 17,826.70 17,924.90 17,800.30 -0.10%

 

आज 'या' कंपन्यांच्या शेअर दरात तेजी-घसरण

आज, शेअर बाजारात झालेल्या व्यवहारात एनटीपीसीच्या शेअर दरात 3.19 टक्क्यांची तेजी दिसून आली. त्याशिवाय, पॉवरग्रीड 0.93 टक्के, टाटा स्टील 0.76 टक्के, एचडीएफसी 0.48 टक्के, एचडीएफसी बँक 0.44 टक्के, लार्सन 0.40 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.35 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 0.30 टक्क्यांच्या तेजीसह बंद झाले. 

तर, टाटा मोटर्सच्या शेअर दरात 1.42 टक्क्यांची घसरण झाली. त्याशिवाय, सन फार्मा 1.40 टक्के, विप्रो 1.19 टक्के, अल्ट्राटेक सिमेंट 1.12 टक्के, टीसीएस 1.05 टक्के, टेक महिंद्रा 0.87 टक्के, बजाज फिनसर्व्ह 0.85 टक्के, टीसीएल 0.85 टक्के, एचडीयू 0.8 टक्के. बँक 0.61 टक्के, कोटक महिंद्रा बँक 0.50 टक्के, आयटीसी 0.44 टक्क्यांची घसरण झाली. 

गुंतवणूकदारांना फटका

आज बाजारात झालेल्या घसरणीचा फटका गुंतवणूकदारांना बसला आहे.  आज, मुंबई शेअर बाजारावर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे बाजार भांडवल 265.23 लाख कोटी रुपये इतके झाले. सोमवारी बाजार भांडवल 265.91 लाख कोटी रुपये इतके होते. याचाच अर्थ आजच्या व्यवहारात गुंतवणूकदारांचे जवळपास 68 हजार कोटींचे नुकसान झाले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या: