S S Mundra : आरबीआयचे माजी डेप्युटी गव्हर्नर एस.एस. मुंद्रा यांची बीएसईचे (BSE) चेअरमन म्हणून नियुक्त केली आहे. दरम्यान, या नियुक्तीला मार्केट रेग्युलेटर सेबीची मान्यता मिळणे बाकी आहे. एसएस मुंद्रा 30 जुलै 2017 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून निवृत्त झाले आहेत.


याआधी त्यांनी बँक ऑफ बडोदाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे. तेथून ते जुलै 2014 मध्ये निवृत्त झाले. चार दशकांहून अधिक काळ बँकिंग कारकिर्दीत मुंद्रा यांनी काम केले आहे. त्यांनी युनियन बँकेचे कार्यकारी संचालक म्हणून अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मुंद्रा यांनी युनियन बँक ऑफ इंडियाचे कार्यकारी म्हणूनही काम केले आहे. त्यांनी G20 मंचाच्या आर्थिक स्थिरता मंडळावर आणि त्याच्या विविध समित्यांवर आरबीआयचे नामनिर्देशित म्हणून काम केले आहे. ते OECD च्या आर्थिक शिक्षणावरील आंतरराष्ट्रीय नेटवर्कचे (INFE) उपाध्यक्ष देखील राहिले आहेत.


या बहुआयामी कंपन्यांमध्ये सेवा 
आरबीआयमध्ये सामील होण्यापूर्वी मुंद्रा यांनी क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड (CDSL), BOB अॅसेट मॅनेजमेंट कंपनी, इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कॉर्पोरेशन (यूके) यांसारख्या अनेक बहुआयामी कंपन्यांच्या बोर्डवर देखील काम केले आहे. याशिवाय त्यांनी इंडिया फर्स्ट लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, स्टार युनियन दाई-इची लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्येही काम केले आहे.


मुंद्रा यांची अध्यक्ष म्हणून विविध व्यासपीठांवर नियमित उपस्थिती राहिली आहे. बँकिंग, वित्तीय समावेशन आणि साक्षरता, एमएसएमई वित्तपुरवठा, ऑडिटिंग, फसवणूक जोखीम व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, ग्राहक संरक्षण, मानव संसाधन व्यवस्थापन इत्यादींसह विविध विषयांवर त्यांनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मंचांवर 60 हून अधिक भाषणे/सादरीकरण केले आहे. यातील अनेक भाषणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट्सच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाली आहेत. 


महत्वाच्या बातम्या


Stock Market : शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी उसळी, सेन्सेक्समध्ये 1344 अंकांची वाढ, निफ्टी 16250 वर