Share Market : शेअर मार्केटमध्ये (Share Market) गुंतवणूक (Investment) करणाऱ्यांसाठी एक दिलासादाय बातमी आहे. कालच्या 1 हजार अंकांच्या घसरणीनंतर आज भांडवली बाजारानं उसळी घेतली आहे. सेन्सेक्स 523 अंकांनी वधारला आहे. तर निफ्टी 151अंकांनी वर आली आहे. जागतिक बाजारातील चांगल्या उसळीनंतर भारतीय भांडवली बाजारात देखील उसळी पाहायला मिळत आहे. ऑटो आणि ऊर्जा क्षेत्रातील समभागात आज चांगली तेजी पाहायला मिळत आहे. तर डॉलरच्या तुलनेत रुपया 83.47 वर उघडला आहे.
काल बाजार सुरु होताच सेन्सेक्स (sensex) 750 अंकांनी कोसळला होता. तर निफ्टी (Nifti) 180 अंकांनी खाली आला होता. परकीय निधीचे निर्गमन झाल्याने बाजारात गुंतवणूकदारांकडून (Investment) नफा वसुलीला प्राधान्य देण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10 वाजता शेअर बाजारात थोडी रिकव्हरी झाली आहे. निफ्टी 151 अंकांनी वर आला आहे. तर सेन्सेक्स 22,109 च्या पातळीवर पोहोचला आहे. 523 अंकांच्या उसळीनंतर सेन्सेक्स 72913 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
BSE सेन्सेक्सच्या 30 समभागांपैकी 25 समभागांच्या व्यापारात वाढ होत आहे. तर 5 समभागांमध्ये घसरण होत आहे. आयटीसीचे शेअर्स 2.13 टक्क्यांनी आणि सन फार्मा 1.75 टक्क्यांनी वधारले आहेत. JSW स्टील 1.84 टक्के आणि NTPC 1.37 टक्क्यांनी वधारले आहे.
महत्वाच्या बातम्या:
शेअर बाजारात घसरण, सेन्सेक्स 750 अंकांनी कोसळला, तर निफ्टी 180 अंकांनी खाली