Soft Drinks : जगातील कोणत्या देशात शीतपेयांचा (soft drinks) सर्वाधिक वापर होतो? याबाबत तुम्हाला माहीत आहे का? तर याचं उत्तर आहे उत्तर अमेरिका (North America). उत्तर अमेरिकेतील प्रत्येक व्यक्ती एका वर्षात 216 लिटर कार्बोनेटेड शीतपेये पितात. कार्बोनेटेड शीतपेयांचा वापर करणाऱ्या पहिल्या दहा देशांपैकी सहा देश हे अमेरिकेतील आहेत. यामध्ये अर्जेंटिना, चिली, मेक्सिको, कॅनडा आणि उरुग्वे यांचा समावेश आहे. या यादीत भारत सर्वात खालच्या क्रमांकावर आहे. भारतात कार्बोनेटेड शीतपेयांचा दरडोई वार्षिक वापर फक्त 4.2 लिटर आहे. 


कोणत्या देशात किती वापर?


कार्बोनेटेड शीतपेयांमध्ये सामान्य पाण्यापेक्षा जास्त कार्बन डायऑक्साइड असतो. कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन सर्रास होत आहे. काही लोक ते चवीनुसार पितात तर काहींचा दावा आहे शीतपेयांचा वापर केल्यानं पचनक्रिया सुधारते.अमेरिकेनंतर अर्जेंटिनामध्ये त्याचा खप सर्वाधिक आहे. तेथील प्रत्येक व्यक्ती एका वर्षात 155 लिटर कार्बोनेटेड शीतपेये पितात. चिलीमध्ये त्याचा वार्षिक वापर दरडोई 141 लिटर आहे. त्याचप्रमाणे मेक्सिकोमध्येही प्रत्येक व्यक्ती एका वर्षात सरासरी 137 लिटर शीतपेये पितात. त्यापाठोपाठ आयर्लंड 126 लीटर, कॅनडा 119.8 लीटर, नॉर्वे 119.8 लीटर, उरुग्वे 113 लीटर, बेल्जियम 102.9 लीटर आणि ऑस्ट्रेलिया 100.1 लीटर यांचा क्रमांक लागतो. यूकेमध्ये, प्रत्येक व्यक्ती एका वर्षात 96.5 लीटर कार्बोनेटेड शीतपेये पितो, तर नेदरलँडमध्ये ही संख्या 96.1 लीटर आहे.


भारताचा क्रमांक किती?


सौदी अरेबिया (89 लिटर), बोलिव्हिया (89 लिटर), न्यूझीलंड (84.2 लिटर), स्वीडन (82.4 लिटर), स्वित्झर्लंड (81.4 लिटर), डेन्मार्क (80 लिटर) आणि ऑस्ट्रिया (78.8 लिटर) यांचा क्रमांक लागतो. युरोपीय देश जर्मनीमध्ये कार्बोनेटेड शीतपेयांचा दरडोई वापर 72 लिटर आणि रशियामध्ये 66.4 लिटर आहे. ब्राझीलमध्ये 59.5 लिटर, फिनलंडमध्ये 52 लिटर, इटलीमध्ये 50.2 लिटर, स्पेनमध्ये 39.2 लिटर, फ्रान्समध्ये 37.2 लिटर, इंडोनेशियामध्ये 23 लिटर, जपानमध्ये 21.6 लिटर आणि भारतात 4 लिटर आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik News : आला आला उन्हाळा! शीतपेय पिताना तपासून घ्या, अन्न आणि औषध प्रशासनाचे महत्वाचं आवाहन