नवी दिल्ली : अर्थ मंत्रालयाच्या इकोनॉमिक अफेअर्स डिपार्टमेंटनं एक परिपत्रक जारी केलं आहे. त्यानुसार 1 ऑक्टोबरपासून सूक्ष्म बचत योजनांसाठी नवे नियम जारी केले जाणार आहे. हे नियम दोनपेक्षा अधिक खाती असणाऱ्यांना किंवा नियमित खातेधारकांना लागू असतील.
नॅशनल स्मॉल सेविंग्ज अकाऊंटस
2 एप्रिल 1990 पूर्वी ज्यांनी या योजनेत खाती उघडली आहेत त्यांना योजनेचे व्याज दर लागू राहतील. पोस्ट ऑफिस बचत खात्यावर योजनेच्या दरासह 2 टक्के अधिक व्याज शिल्लक रकमेवर मिळेल. 1 ऑक्टोबरनंतर या दोन्ही खात्यांवर व्याज मिळणार नाही.
2 एप्रिल 1990 नंतर उघडलेल्या खात्यापैकी पहिल्या खात्यावर योजनेचा दर लागू असेल. दुसऱ्या खात्याला पोस्ट ऑफिस बचत योजना दर लागू असेल. या खात्यावर देखील 1 ऑक्टोबरनंतर व्याज मिळणार नाही.
ज्यांच्याकडे दोन पेक्षा अधिक खाती असतील त्यांना व्याज मिळणार नाही. मुद्दल रक्कम देखील परत केली जाईल.
पीपीएफ खात्याबाबत कोणते बदल?
पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याज ज्यावेळी अल्पवयीन खातेधारक 18 वर्ष पूर्ण करेल त्यावेळी मिळेल. त्यानंतर जो लागू असेल तो व्याज दर मिळेल.
ज्यांच्याकडे एकपेक्षा अधिक पीपीएफ खाती असतील त्यापैकी मूळ खात्यावर योजनेच्या दराप्रमाणं व्याज मिळेल, मात्र त्यासाठी निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेत गुंतवणूक करावी लागेल.
दुसऱ्या खात्यातील शिल्लक रक्कम मूळ खात्यात वर्ग केली जाईल. अतिरिक्त रक्कम खातेधारकाला परत केली जाईल आणि त्यावर 0 टक्के व्याज मिळेल.दोन पेक्षा अधिक जी खाती असतील त्यावर सुरुवाती पासून 0 टक्के व्याज मिळेलं.
अनिवासी भारतीय व्यक्तींच्या पीपीएफ खात्यांसाठी रहिवासाची माहिती देण्याची गरज नाही. त्यांना पोस्ट ऑफिस बचत खाते व्याज दर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत व्याज मिळेल. त्यानंतर तिथं 0 टक्के व्याज मिळेल.
सुकन्या समृद्धी योजना
आजी आजोबांकडून त्यांच्या नातवंडांसाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडण्यात येते. या खात्यांची सुरक्षा मुलांच्या कायदेशीर पालकांकडे वर्ग करण्यात यावी. जर दोन पेक्षा अधिक खाती उघडण्यात आली असतील तर ते योजनेच्या नियमांचं उल्लंघन मानलं जाईल.
दरम्यान, प्रत्येक पोस्ट ऑफिसला खातेधारक, पालक यांच्याकडून पॅन कार्ड आणि आधारची माहिती गोळा करावी लागणार आहे. त्यानुसार ती माहिती अपडेट करावी लागले. पोस्ट ऑफिसेसना बदलेल्या नियमांबद्दलची माहिती खातेधारकांना द्यावी लागेल.
इतर बातम्या :