Auto News : नवीन गाडी घेण्याच तुम्ही प्लानिंग करत असाल तर थोडं थांबा. कारण पुढील महिन्यात म्हणजे ऑगस्ट महिन्यात अनेक कंपन्या आपल्या दमदार कार भारतीय बाजारात लॉन्च करत आहेत. या कार मजबूत इंजिनसह अपडेटेड फीचर्स सुसज्ज असतील. लॉन्च होणाऱ्या कारमध्ये स्कोडा, होंडा आणि टाटा कंपन्यांच्या कारचा समावेश आहे. पुढच्या महिन्यात म्हणजे ऑगस्टमध्ये कोणत्या गाड्या भारतात दाखल होतील, यावर एक नजर टाकुया.
स्कोडा कुशाक 1.2 पेट्रोल (Skoda Kushaq 1.2 Petrol)
प्रसिद्ध कार निर्माता कंपनी स्कोडाने नुकतीच भारतात आपली नवीन एसयूव्ही कार कुशक लाँच केली आहे. लॉन्चच्या वेळी कंपनीने बाजारात फक्त एक लिटर पेट्रोल इंजिन प्रकार बाजारात आणला होता. पण आता कंपनी आपले 1.5 लिटर पेट्रोल इंजिन प्रकार बाजारात उपलब्ध करणार आहे. या मॉडेलची डिलिव्हरी 11 ऑगस्टपासून सुरू होईल.
होंडा अमेझ (Honda Amaze)
जपानची लोकप्रिय ऑटो कंपनी होंडा आपली नवीन कॉम्पॅक्ट सेडान होंडा अमेझ नवीन अपडेटसह बाजारात आणणार आहे. ही कार 17 ऑगस्ट रोजी उपलब्ध केली जाईल. कंपनीने त्याचे एक्टीरियर बदलले आहे. कारच्या नवीन डिझाइनमध्ये एलईडी हेडलॅम्प्स, अॅलोय व्हील्सचा एक नवीन सेट देण्यात आला आहे. त्याचे ट्विस्टेड बम्परसुद्धा आहे. नवीन कार नवीन कलर ऑप्शन्ससह लॉन्च केली जाऊ शकते. होंडा अमेझ कारला बीएस 6, 1.5 एल आय-डीटीईसी डिझेल इंजिन दिले जाऊ शकते, जे 99bhp पॉवर आणि 200Nm पीक टॉर्क जनरेट करते. मॅन्युअल आणि सीव्हीटी दोन्ही ऑटोमॅटिक गिअरबॉक्सेस यात देण्यात येतील.
टाटा टियागो एनआरजी (TATA Tiago NGR)
भारतातील प्रसिद्ध कार निर्माता टाटा मोटर्ससुद्धा पुढील महिन्यात आपली अपडेटेड टाटा टियागो एनआरजी कार लॉन्च करू शकते. यात 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.0 लिटर डिझेल इंजिन दिले जाऊ शकतात. टियागोच्या अपडेटेड मॉडेलच्या बाह्य भागात थोडे बदल केले जाऊ शकतात. मात्र इंटिरियरमध्ये काही बदल दिसतील. ही कार बीएस 6 पॉवरट्रेनसह बाजारात येणार आहे.